खाडी क्षेत्रातील कांदळवांनीची हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. Pudhari
रायगड

Raigad News | कांदळवनांवर नजर ठेवण्यासाठी 120 कोटींचा प्रकल्प

निविदा प्रसिद्ध; संस्थांची पडताळणी सुरू; 195 संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

पुढारी वृत्तसेवा

रायगड | खाडी क्षेत्रातील कांदळवांनीची हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर काही संस्था पुढे आल्या असून या संस्थांची पडताळणी सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण येथील एकूण 195 कांदळवनांतील संवेदनशील ठिकाणी एकूण 669 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

त्याप्रमाणे कांदळवन क्षेत्रात सीसटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करीत आहेत. मुंबई महानगर क्षेत्र, रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्राचे सर्वेक्षण व पडताळणी करून एकूण 195 संवेदनशील ठिकाणी एकूण 669 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण येथील एकूण 195 कांदळवनांतील संवेदनशील ठिकाणी एकूण 669 सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी 119.88 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विनंतीनुसार हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दरम्यान निविदा प्रसिद्ध केल्यानंतर काही संस्था पुढे आल्या आहेत. सध्या या संस्थाची पडताळणी सुरू आहे.

कांदळवनांचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे तसेच काही ठिकाणी कांदळवनांची कत्तल करून गोदामे इमारती उभ्या राहिल्या आहेत. राडारोडा भराव टाकून भूमाफिया कांदळवन नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भिवंडी येथील कशेळी भागात खाडी किनारी असलेल्या कांदळवनांवर राडारोडा टाकून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे कांदळवन क्षेत्राच्या परिसरावर नजर ठेवता येईल. यामुळे कांदळवन टाकण्यात येणारा भराव रोकता रोखला जाईल तसेच भूमाफियांवर कारवाई करणे शक्य होईल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून येथील कांदळवन क्षेत्रावर वनविभागाचे लक्ष राहणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे कांदळवनाच्या संरक्षणाला खीळ बसली आहे. लवकरच कांदळवनांच्या क्षेत्रांना केंद्रीकृत नियंत्रण कक्षासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भूमाफियांना पकडण्यासाठी जलद कृती दल तैनात करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
बी. एन. कुमार, संचालक. नॅटकनेक्ट फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT