रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय बहुमान Pudhari Photo
रायगड

Raigad | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय बहुमान

पुढारी वृत्तसेवा

रायगड : केंद्रीय सहकार मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने देशात सुरू झालेली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था यांच्या संगणकीकरणाची मोहीम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पूर्ण केलेली आहे. त्याचे सादरीकरण 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्याद्वारे ओरिसा राज्यात भुबनेश्वर या ठिकाणी केले जाणार आहे. विशेष म्हणजे देशपातळीवर हा उपक्रम पूर्ण करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली बँक ठरली आहे.

भुवनेश्वर येथेे होणार्‍या विशेष राष्ट्रीय कार्यक्रमात नाबार्डचे अध्यक्ष के.व्ही.शाजी, केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मुख्य सचिव आशीष कुमार भुतानी, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, नाबार्ड महाराष्ट्र विभाग कार्यालयाच्या प्रमुख रश्मी दराड, सर्व राज्यांचे सहकार सचिव, आयुक्त, नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी आणि देशापातळीवरील सहकार विषयाचे प्रमुख अभ्यासक यावेळी उपस्थित राहणार आहेत.

रायगड जिल्हा बँकेने केलेले काम हे उल्लेखनीय असून राज्यातील इतर सहकारी बँकांनी देखील त्याची प्रेरणा घेऊन काम करावे असे कौतुक राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. संपूर्ण भारतामधील 62,318 विविध कार्यकारी सहकारी संस्थांना अधिक सक्षम आणि व्यवसायभिमुख बनविण्याच्या दृष्टीकोनातून या सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचा अभिनव प्रकल्प केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील 28 राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा प्रकल्प वेळेच्या आधीच पूर्ण करून संगणकीकरणामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT