Raigad Accident Pudhari
रायगड

Raigad Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे

भरधाव बीएमडब्ल्यूची दुचाकी व टोयोटा अल्टोला जोरदार धडक

पुढारी वृत्तसेवा
इलियास ढोकले

नाते : मुंबई-गोवा महामार्गावर चांढवे गावाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आज, दि. 17 मे रोजी सायंकाळी सुमारे 5.50 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने पुढे जाणाऱ्या दुचाकीला तसेच टोयोटा अल्टो कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी बीएमडब्ल्यू कार शिंदे कोडजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर सर्वप्रथम कारने एमएच-08-बीएलटी-643 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार बचावला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

यानंतर बीएमडब्ल्यू कारने पुढे असलेल्या टोयोटा अल्टो कारलाही जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारच्या पुढील व मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मडणिससह औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT