रायगड एसटी प्रेमी संघटनेच्या वतीने चालक सचिन बावस्कर आणि वाहक संदीप गोसावी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. Pudhari
रायगड

Raigad MSRTC News | एका फेरीत १ लाख १ हजार ४६२ रुपयांचे उत्पन्न; अलिबाग-शेगाव बसच्या चालक-वाहकांचा सत्कार

अलिबाग आगारातील अलिबाग-शेगाव बससेवेने विक्रमी महसूलाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Record Revenue ST Bus Alibaug Shegaon

अलिबाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अलिबाग आगारातील अलिबाग-शेगाव बससेवेने विक्रमी महसूलाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १५ जून २०२६ रोजी या बसचे चालक सचिन बावस्कर आणि वाहक संदीप गोसावी यांनी एका फेरीत तब्बल १ लाख १ हजार ४६२ रुपयांचे उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय या फेरीत १०७.८८ टक्के भारमान नोंदविण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रायगड एसटी प्रेमी संघटनेच्या वतीने चालक सचिन बावस्कर आणि वाहक संदीप गोसावी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

सत्कार समारंभास अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे उपस्थित होते. तसेच रायगड एसटी प्रेमी संघटनेचे अमित कंटक, स्वप्नील भगत, संकेत पाटील आणि समीर रांजणकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग आगारातील कर्मचारी संदीप असलकर आणि रितेश पाटील हेही उपस्थित होते.

एसटी सेवेच्या यशामध्ये चालक व वाहक यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत असून, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अलिबाग-शेगाव मार्गावरील बससेवा महसूल आणि प्रवासीसंख्या या दोन्ही बाबतीत यशस्वी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT