रायगडात दीड महिन्यात सरासरीच्या 32 टक्केच पाऊस pudhari photo
रायगड

Raigad rainfall deficit : रायगडात दीड महिन्यात सरासरीच्या 32 टक्केच पाऊस

नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी; सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान; जिल्ह्यातील शंभर घरांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत 32 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यातील जीवित हानी पशुधन हानी मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नागरिकांचे स्थलांतर अश्या विविध घटनांची नोंद झाली आहे.

पेण तालुक्यात कामार्ली येथील चंद्रभागा नामदेव पाटील ह्यांच्या घराची भिंत कोसळून 1 व्यक्ती जखमी झाली आहे. तर महाड तालुक्यातील शिंगरकोन्ड येथील सुरेश गणपत भोसले यांचा नदीमध्ये पाय घसरून मयत झाले आहे तर तळा येथील 2 बोकड आणि 1 शेळी तर महाड येथील 1 बकरी हि लहान जनावरे मयत झाली तर मोठ्या जनावरे मध्ये माणगाव येथील 1 बैल, सुधागड येथील 3 म्हैस, 2 बैल 1 गाय, आणि पोलादपूर येथील 1 बैल आणि 1 गाय अशी 9 जनावरे मुसळधार पावसामुळे मयत झाले आहेत.

पावसामुळे खालापूर तालुक्यातील वासंबे येथील एका कुटुंबाच्या घराची भिंत कोसळल्याने तेथील 4 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पूर्णतः पक्की घरे मध्ये खालापूर येथील 1 घराचे नुकसान झाले आहे. पूर्णतः कच्च्या घरामध्ये पेण येथील 1, महाड येथील 1 अशी 2 घरांचे नुकसान झाले असून अंशतः पक्की घरे एकूण 73 आहेत. यामध्ये अलिबाग मधील 10, मुरुड 2, पेण 9, पनवेल 2, रोहा 5, सुधागड 9, श्रीवर्धन -तळा प्रत्येकी 1, माणगाव तालुक्यात 9, महाड येथे 1 आणि पोलादपूर तालुक्यात 22 घरांचे नुकसान झाले आहे. अंशतः कच्ची घरे एकूण 31 असून यामध्ये अलिबाग पेण श्रीवर्धन आणि पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी 1 , मुरुड मध्ये 2 पनवेल खालापूर माणगाव येथील प्रत्येकी 3 सुधागड येथील 6 आणि सर्वात जास्त महाड येथे 10 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच पेण येथील 1 झोपडी, जिल्ह्यातील 14 गोठे इत्यादीचे नुकसान झाले आहे.

सार्वजनिक मालमत्तेमध्ये तळा येथील देवळाचे अंशतः महाड तालुकयातील बेलोशी येथील राजिप शाळांचे अंशतः तर पोलादपूर येथील सभागृहाचे आणि रोहा येथील भात केंद्राचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या चे पंचनामे सुरु असून ते झ्याल्यावर नुकसान भापाई मिळणार असल्याचे आपत्ती विभागाचे प्रमुख सागर पाठक ह्यांनी सांगितले.

आपत्ती विभागासाठी 70 लाखाचा निधी आला असून तो तालुक्याला वाटप केला आहे. मे महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे कर्जत येथील एका व्यक्तीचे वीज पडून मयत झाले होते त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे 4 लाखाची मदत देण्यात आली आहे.

65 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडून नुकसान झाले असल्यास शासनाच्या जीआर नुसार तो मदत देण्यास पात्र ठरतो. यामध्ये पूर्णतः पक्के घरासाठी 1 लाख 30 हजार, पूर्णतः कच्य्या घरासाठी 1 लाख 20 हजार अंशतः पक्क्या घरासाठी 6 हजार 500 तर अंशतः कच्चे घरासाठी 4 हजार, झोपडी साठी 8 हजार, गोठ्यासाठी 3 हजार मदत देण्यात येते. व्यक्ती मयत झाल्यास 4 लाखाची मदत देण्यात येते. मोठे जनावर मयत झाल्यास 37 हजार 500, लहान जनावर मयत झाल्यास 4 हजार मदत देण्यात येते. ओढकाम करणारे जना वर्‍यांसाठी 32 हजार तर लहान जनावरांसाठी 20 हजार एवढी रक्कम देण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT