Mahashivratri Raigad Pudhari
रायगड

Mahashivratri Raigad: रायगडात २५१ शिवमंदिरांत महाशिवरात्री उत्सव; ५२ ठिकाणी पालखी सोहळे

हरिहरेश्वर, कनकेश्वर, जगदीश्वर मंदिरात भाविकांची गर्दी अपेक्षित; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमीत्त एकूण 251 महादेव मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. 52 ठिकाणी पालखी मिरवणूकांसह 28 ठिकाणी स्थानिक यात्रा आहेत. जिल्ह्यातील सर्व शिवमंदिरांमध्ये भजन आणि कीर्तन आदि उपक्रमांसह रात्रभर जागर केला जातो. अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादचे आयोजन केले जाते. रायगड जिल्ह्यात महाशिवरांत्रीचा सण अतिशय उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भावीक येणार आहेत.मंदिर व्यवस्थापन समीतीने त्यांकरिता नियोजन केले आहे. येथे काळभैरव आणि योगेश्वरी सोबतच महादेवाचे मुख्य स्थान आहे.कनकेश्वर येथे डोंगरावर असलेल्या कनकेश्वर देवस्थात देखील महाशिरात्रीच्या उत्सावाचे आयोजन करण्यात येते. येथे पहाटे पासूनच भावीकांची मोठी गर्दी होत असते. कनरेश्वर मंदिर अतिशय सुंदर असून भाविकांना पायऱ्या चढून जावे लागते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा असते.

चौल येथील रामेश्वर हे एक प्राचीन शिवमंदिर असून येथेही परंपरेनुसार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहे. श्री जगदीश्वर मंदिर हे महाशिवरात्रीचे मुख्य आकर्षण असते.महाराज स्वतः या मंदिरात महादेवाची पूजा करत असत.येथेहीभाविक मोठ्या प्रमाणात येतअसतात.

रायगड पोलिसांचा विशेष बंदोबस्त

आज शनिवारची सुट्टी, उद्या रविवारी महाशिवरात्रीचा सण यामुळे मुंबई, पुण्यात नोकरी-व्यवसायाच्या निमीत्ताने असणारे रायगडवासीय प्रतिवर्ऱ्षी प्रमाणे आवर्जून आपापल्या गावी येणार तसेच सर्व शिवमंदिरांच्या ठिकाणी येणारे यात्रेचे स्वरुप हे विचारात घेवून, भावीकांची कोणत्याही प्रकारे वाहतूक कोडीं वा अन्य कारणास्तव गैरसोय होऊ नये या करिता रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी विशेष पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार 74 पोलीस अधिकारी, 450 पोलीस अंमलदार, तीन एआसीफी टिमसह तीन स्ट्रायकींग फोर्स टिम आणि 49 वाहतूक अंमलदार यांची नियुक्ती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT