खोपोली (रायगड) : खोपोली नगरपरिषदेच्या काजूवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील ४० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाकीच्या गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे मागील ४ महिन्यांपासून एक वेळ पाणी पुरवठ्याचे खोपोली शहरातील संकट दूर झाले आहे. शनिवार, ३० ऑगस्ट पासून खोपोलीच्या सर्व भागात दोन्ही वेळेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील दिली आहे.
खोपोली नगरपरिषद येथील काजूवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील साठवण टाकीला अनेक वर्षांपासून गळती सुरू होती, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. तसेच नगरपरिषदेवर फार मोठा आर्थिक भार पडत होता. त्यामुळे साठवण टाकीस असलेली गळती काढण्याचे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन ती गळती दूर करण्यात आल्याने आता खोपोलीतील नागरिकांना दोन वेळ पाणी मिळणार असल्याने खोप-ोलीतील नागरिकांनी नगरपालिकेच्या या निर्णयाबाबत कौतुक करीत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील ययांचेही आभार मानले आहेत.
खोपोली शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या कामासाठी नगरपरिषदेस वाढीव पाण्याचे पंपिंग करावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वीज देयकात देखील वाढ होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करीत थकीत पाणीपट्टी कराचा भरणाही करावा,डॉ. पंकज पाटील पाटील, मुख्याधिकारी