खोपोली : प्रशांत गोपाळे
मुंबई पुणे या दोन मुख्य शहरांच्या मध्यभागी असणारे खोपोली शहर व खालापूर तालुका नव्या दिशेने वाटचाल करीत असून नवीन कारखानदारी व शहरात नवीन मुंबईतील धनिकांच्या माध्यमातून तयार होणारे संकुले यामुळे शहरात व तालुक्यात या माध्यमातून वाढते नागरीकरणामुळे शहराला व तालुक्याला बदलते स्वरूप मिळत आहे. खोपोली शहरातून थेट मुंबईत दाखल होण्यासाठी रेल्वे मार्ग तर खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गे मुंबई पुण्यात सहज दाखल होण्यासाठी साधन आहे. शहरातुन अनेक कुटूंब निवांत वास्तव्यासाठी खोपोली व खालापूरची निवड करताना दिसत असल्याने आगामी काळात या तालुक्यासह शहराचा कायपालट झालेला दिसेल, यात शंका नाही.
खोपोली शहर हे एकेकाळची सोन्याची धूर काढणारी नगरी म्हणून ओळख होती मधल्या काळात मंदीच्या लाटेत अनेक कारखाने मंदीच्या लाटेचा फटका बसल्याने बंद पडले त्यामुळे मधल्या काळात काहीसा फटका खोपोली शहराच्या व खालापूर तालुक्याच्या विकासावर बसला असला तरी पुन्हा एकदा भूषण स्टील कारखाना टाटा कंपनीने घेतला तर नव्याने उभारणी होत असलेल्या गोदरेज प्रकल्प ही उभा राहिला असल्याने यासह अन्य जीवित असणाऱ्या कारखान्याकडून सामाजिक दायित्व फडांतून गावाच्या विकासासाठी शासनाच्या योजना राबविण्यासाठी बळ देण्याचे काम सुरु असून या कारखान्याच्या माध्यमातून सुशीक्षित बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळण्याची अपेक्षा पूर्णत्वास यईल. या ठिकाणी हजारो तरुणांना नोकऱ्या मिलतील अशा स्वरूपाचे कारखाने आहेत अशी चर्चा बेरोजगार तरुणांमध्ये आहे. तर अनेक छोटे मोठे कारखानेही येत असल्याने खोपोली शहर खालापूरच्या विकासाला चालना मिळेल यात शंका नाही.
पर्यटन - खोपोली शहराची ओळख ही थंड हावेचे ठिकाणी असणाऱ्या खंडाला घाटाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात असणारे शहर म्हणून ओळख आहे खोपोली शहरात गगनगिरी महाराजांच्या आश्रमाची ओळख असून मुंबई पुणे हे दोन मुख्य शहराच्या मध्यभागी असणारे शहर असल्याने शहरात वाढती लोकसंख्या होणारे नवनवीन गृहसंकुले असणाऱ्या सुविधा त्यामुळे खोपोली वास्तव्यासाठी सर्वात उत्तम म्हणून आज शहराकडे पाहिले जाते.
खालापूर संताची पावनभूमी खालापूर तालुक्याला जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे पदपर्शाने पावन झालेल्या साजगाव ताकई परिसराला संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंधरी म्हणून ओळख आहे या ठिकाणी कार्तिकी एकादशीला बोंबल्या विठोबाची यात्रा भरते या यात्रेतून भेट देवून अनेक वारकरी आळंदी कडे प्रस्थान करतात.
अष्टविनायकांपैकी एक ‘श्री वरद विनायक’
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागुनच दोन किलोमीटरच्या अंतरावर महड गावात अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या श्री वरद विनायकाचे स्थान आहे.या ठिकाणी मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तून भक्तगण दर्शनासाठी येत असतात या मंदिराच्या बाजूला एक सुंदर तलाव असून या ठिकाणी निवांत पणे भक्त गण मंदिराच्या कळसाकडे पाहून मन प्रसन्न करीत असतात तर अनेक जन चतुर्थीला अन्नदान होत असल्याने याचाही आस्वाद येणारे भाविक घेत असतात त्याच बरोबर याठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने राहण्यासाठी आश्रम शाळेसह खासगी खोल्या असल्याने अनेक भक्त गण वास्तव्य ही करीत असतात.या मंदिरामुळे खालापुर धार्मिक स्थळ म्हणून ओळख आहे.
खंडाळा घाटातील शिंग्रोबा देवस्थान
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खंडाला घाटातून पुण्याकडे जाण्यासाठी नागमोडी महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडाळा घाट पार करून जावे लागते या घाटातून प्रवास म्हणजे दुसरे जीवन मात्र या नागमोडी वळणावर प्रवासी वर्गाच्या सुखकर प्रवासाला बळ देणारे शिंग्रोबा देवस्थानाचे स्थान असून या ठिकाणी अतिशय नागमोडी वळणा अगोदर शिंग्रोबाचे चे सुबक मंदिर आहे गाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवासी प्रवासातच दर्शन घेऊन प्रसाद घेऊन प्रवास सुखरूप प्रवास करतो या वेळी प्रत्येक भक्त येथे दर्शन घेताना नाण्यांचा आवाज कानी पडत असल्याने या शिंगोबा देवस्थानांची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे.