रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन pudhari photo
रायगड

Raigad HSC result 2026 : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन

बारावी निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक,

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शनिवार 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. रायगड जिल्ह्याचा एकूण निकाल 93 टक्के लागला असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगीरी केली आहे.

जिल्ह्यातील 15 तालुक्यांत सर्वाधिक 97.11टक्के विद्यार्थी श्रीवर्धन तालुक्यात उत्तीर्ण झाले असून टक्केवारीत श्रीवर्धन तालुका जिल्ह्यात पहिला ठरला आहे. उर्वरित तालुक्यांच्या निकालात तळा 96.69,कर्जत 96.31, म्हसळा 96.31,पनवेल 94.73, अलिबाग 95.39,पेण 93.94, रोहा 94.29, उरण 94.03, महाड 92.73, माणगाव 93.51,पोलादपूर 88.84 ,सुधागड 88.44, मुरूड 88.46 आणि खालापूर तालुक्याचा निकाल 85.02 टक्के लागला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालाची उत्सुकता केवळ विद्यार्थांच नाही तर ती पालाकानाही असते. या निकालातील गुणवत्तेवर पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवलेले असते. ते सध्या करण्यासाठी या गुणांना महत्व दिले जाते.

दरम्यान अलिबाग तालुक्यात 2559 विध्यार्थ्यानी 12 वी च्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यामध्ये 1212 मुलांनी तर 1367 मुलीनी अर्ज भरले होते. प्रत्यक्षात परीक्षेला मात्र 1210 मुले तर 1332 मुलींनी परीक्षा दिली.

शनिवारी जाहीर झालेल्या निकालातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे मुलांपेक्षा 4 ताक्केनी अधिका असल्याचे पाहायला मिळते. 1130 मुले उत्तीर्ण झाली तर 1295 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.38 तर मुलींचे 97.12 टक्के इतके आहे. निकालानानातर सर्व विद्यार्थ्यानी पेढे वाटून आनंद साजरा केला.

अलिबाग तालुक्यांत मुलींनीच मारली बाजी

अलिबाग तालुक्याच्या निकालात यंदा पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे.मुलींचे उतीर्ण होण्याचे प्रमाण 97.12 टक्के आहे. तर तालुक्याचा निकाल 95.39 टक्के लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT