Raigad weather forecast pudhari photo
रायगड

Raigad rain update: रायगडमध्ये पावसाचा जोर कायम; माथेरानमध्ये सर्वाधिक १५७.४ मिमी नोंद

आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या २४ तासांच्या पावसात एकूण १,०४५ मिमी पर्जन्याची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी ६५.३१ मिमी इतकी राहिली आहे. सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये १५७.४ मिमी नोंदविण्यात आला असून, त्यापाठोपाठ कर्जत १०४ मिमी, माणगाव व तळा प्रत्येकी ९६ मिमी, खालापूर ९५ मिमी आणि म्हसळा ७५ मिमी पावसाची नोंद झाली.

इतर तालुक्यांमध्ये पनवेल ६०.६ मिमी, उरण ५६ मिमी, पेण ५५ मिमी, पोलादपूर ५३ मिमी, मुरूड ५२ मिमी, सुधागड ४३ मिमी, महाड ३८ मिमी, रोहा ३० मिमी, श्रीवर्धन २१ मिमी आणि अलिबाग १३ मिमी पाऊस झाला.

डोंगराळ भागात पावसाचा जोर कायम असल्याने नद्या-नाले आणि धबधब्यांजवळ नागरिकांनी व पर्यटकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT