कळंबोली : दीपक घोसाळकर
रणरणत्या उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच जात असून कळंबोलीसह पनवेलचा सोमवारचा (दि.7) रोजी पारा हा अधिकच होता. 41 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद सोमवारी झाली आहे. तळपता सूर्य हा आग ओकत असल्याने उन्हाचा तडाका हा नागरिकांना तीव्र प्रमाणात जाणवत आहे.
अधिकच्या तापमानातून वाचण्यासाठी नागरिकांनी विविध आरोग्यविषयक उपायोजना घेऊन आपल्या आरोग्याची काळज घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध भित्ति पत्रके पोम्प्लेट व जनजागृती द्वारे करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य असल्याने कर्फ्यू लागले की काय असा संभ्रम नागरिकांना पडत आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तळपता सूर्य हा मोठ्या प्रमाणावर आग ओकत असल्याने सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाका हा नागरिकांना जाणवत आहे. सिमेंट काँक्रीटच्या उभ्या असलेल्या कळंबोलीतील जंगलात , हवेतील प्रदूषण,भरमसाठ वाहनांची संख्या , त्यामुळे उन्हाचा तडाका हा कळंबोलीकरणाना जास्त जाणवत आहे. नागरिकांना गार वारा आणि सावली देणारी झाडे पूर्वी होती. परंतु काही उद्यानांचेही काँक्रिटीकरण झाल्याने उद्यानामध्ये झाडांची सावली दुरापास्त झाली आहे .दुपारच्या वेळेस उद्यानात जाऊन झाडाखाली बसावे तर कळंबोली वसाहती मधील उद्यानात झाडेच नाहीत. नागरिकांनी लावलेली झाडे ही काँक्रिटीकरण करताना काढून टाकली आहेत. तो इत संताप ही नागरिक व्यक्त करीत आहेत . रणरणत्या उन्हाचा तडाका हा कळंबोलीसह पनवेलकरांना चांगलाच बसत आहे. सोमवारी कृषी अधिकार्यांनी तापमानाची घेतलेली नोंद ही 41 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होती .अद्याप पर्यंत दहा मार्चला 42 अंश सेल्सिअस चा पारा पनवेलमध्ये ओलांडला गेला आहे. आग ओळखणार्या सूर्याच्या तळपत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, लिंबाचे सरबत, कोकम सरबत, लस्सी व शीतपेय पिण्याकडे नागरिकांचा कल हा वाढत चाललेला दिसून येत आहे. रसवंतीगृहात गर्दी वाढलेली दिसून येते.
रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी उन्हात जाणे टाळा, सैल सुती कपडे वापरा, चहा कॉफी दारू पिणे टाळा ,स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा, घराबाहेर पडण्यापूर्वी ताजे पूरक अन्न खा , भरपूर पाणी प्या, उन्हात जाताना डोके झाका, छत्री टोपी चा वापर करा, तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका, नेहमी पाणी सोबत ठेवा, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका, सावध रहा आणि स्वतःची काळजी घ्या.डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल मनपा