महाड : मसाजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निघृण हत्या संदर्भात शासन देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज महाडमध्ये केला.
बीड जिल्ह्यातील मस्सा जोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्या संदर्भात आज पर्यंत उघड झालेल्या घटना लक्षात घेता सदरची हत्या ही खंडणी प्रकारातून झाली असून दोन कोटी रुपयांपैकी 50 लक्ष रुपये दिल्याचे उघड झाले आहे .या संदर्भात पकडण्यात आलेल्या एक सोडून सर्व आरोपींना मोका लावण्यात आला असून वाल्मीक कऱ्हाड बाबत मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.
देशमुख कुटुंबीयांच्या भावनेचा बांध आता संपला असून राज्यात विविध ठिकाणी निघत असलेल्या आक्रोश मोर्चा नंतरही लोकांच्या भावनांना सामोरे जाण्याचे तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याच्या भूमिकेत शासन नसल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज महाड दौऱ्याप्रसंगी केला .