file photo 
रायगड

रायगड : गणेश विसर्जनासाठी गेलेले चौघेजण उल्हास नदीत बुडाले; एकाचा मृत्यू तर दोघे बेपत्ता

backup backup

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण उल्हास नदीत बुड्याल्याची घटना आज (दि. २८) कर्जत तालुक्यातील चांदई येथे घडली.यामध्ये एका 12 वर्षीय मुलाला वाचवण्यात यश आले तर स्थानिकांनी एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तर दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. अंधार झाल्याने खोपोली येथील अपघात ग्रस्त सामाजिक टीमने शोध मोहीम थांबवली आहे.

आज सर्वत्र अनंचतुर्दर्शीच्या गणेश बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून गणेश विसर्जना ठिकाणी भक्तांची गर्दी उसळली होती. कर्जत तालुक्यातील उकल येथील चेतन सोनवणे यांच्या घरी पुणे येथील मित्र जगदीश शाहू आणि त्यांचा मुलगा यश जगदीश शाहू हे आले होते. दरम्यान आज बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून सोनवणे कुटुंब आणि त्यांचे मित्र शाहू तर इमारतीमधील नागरिक चांदई येथील उल्हासनदीवरील पुलाजवळ गेले होते. गणेश विसर्जन घाट येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी पोहचले.

दरम्यान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी म्हणून चेतन सोनवणे व त्यांचे मित्र जगदीश शाहू आणि मुलगा यश शाहू त्याच सोबत इमारतीतील राहणारा 12 वर्षीय रोहन रंजन हे पाण्यात उतरले होते. गणेश मूर्तीचे विसर्जनादरम्यान चौघेही पाण्याच्या गाळामध्ये अडकले. यावेळी रोहन रंजन या मुलाला त्यांच्या वडिलांनी पाण्यात उडी मारून वाचविले होते. चेतन सोनवणे, जगदीश शाहू आणि मुलगा यश शाहू हे वाहून गेले. उपस्थितानी आरडाओरड सुरू केला असता स्थानिक तरुणांनी नदीत उडी मारून यश शाहू या मुलाला बाहेर काढले, परंतु यशचा मृत्यू झाल्याचे समजले. तर चेतन सोनवणे आणि त्यांचे मित्र जगदीश शाहू यांचा शोध घेण्यासाठी खोपोली येथील अपघात ग्रस्त सामाजिक टीमला पाचारण केले.

अपघात ग्रस्त सामाजिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. घटनास्थळी नागरिकांची पाहण्यासाठी एकाच गर्दी जमली तर यावेळी तहसीलदार,पोलीस उपविभागीय अधिकारी,कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उकरूळ-चांदई येथील सरपंच आणि,प्रशासन अधिकारी जमले होते.

उल्हास नदीच्या पात्रात बुडालेल्या ठिकाणी अपघात ग्रस्त सामाजिक टीम शोध घेत असताना अंधार खूप झाला होता तर पाण्याचा सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढल्याने नदीच्या पात्राचा अंदाज घेणे कठिण जात होते. घटनास्थळी कोणतीही विजेची सोय नसल्याने अपुऱ्या साधनांमुळे अपघातात ग्रस्त सामजिक टीम शोध कार्यात अडचण निर्माण होत होती, यामुळे रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात अली. उद्या लवकरच सकाळी ही शोध मोहीम पुन्हा सुरुवात करण्यात येल म्हणून साठेलकर यांनी सांगितलं.
एकूणच आज भक्ती भावाने गणेशाला निरोप देत असताना सोनवणे कुटुंबावर तर शाहू कुटूंबावर काळाने झडप घातली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT