जिल्ह्या तपापलेट, कोळंबी, सुरमईला मोठी मागणी Akhilesh Kumar
रायगड

Raigad Fisheries | रायगडमध्ये मत्स्य व्यवसायाची उलाढाल 40 हजार मेट्रीक टनावर

जिल्ह्यात तीन हजाराहून अधिक बिगर यांत्रिकी नौका; पापलेट, कोळंबी, सुरमईला मोठी मागणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

रायगड जिल्ह्यात साधारणपणे 15 हजाराहून अधिक यांत्रिकी नौका आहेत. तर 3 हजाराहून अधिक बिगर यांत्रिकी नौका आहेत. जिल्ह्यात मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या 51 हजाराच्या आसपास आहे.

रायगड जिल्ह्यात पापलेट, कोळंबी, सुरमई, बांगडे या प्रमुख मच्छीला मोठी मागणी आहे. दरवर्षी सुमारे 40 हजार टन मासेमारीचा व्यवसाय असतो. निर्यातीद्वारे राज्याला चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळते. गेल्यावर्षी 6 हजार 923 कोटी रुपयांचे निर्यात मूल्य राज्याला मिळाले.

कोकणात आंबा, भात व मासे हे प्रमुख उत्पन्न काढले जाते. हापूस आंब्याला परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्यातून परकीय चलन मिळत आहे. त्याचप्रमाणे माश्यांनाही परदेशांत तसेच देशातील मोठ्या शहरांमध्ये मागणी असते. पापलेट, कोळंबी, सुरमई, बांगडे या माश्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. त्यामुळे मासे हेसुद्धा परकीय चलन मिळवून देणारे साधन झाले आहे. माशांचा थेट लिलाव बंदरावर होत असल्याने त्याचा फायदा मच्छीमार लोकांना होत आहे. तसेच राज्याच्या तिजोरीतही वाढ होत आहे. ही वाढ कोटींच्या घरात आहे.

कोकणाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. यात आणखी भर पडली ती म्हणजे जलसंपत्तीची. लहान मोठ्या दर्‍या, समुद्राला जोडणार्‍या खाड्या, समुद्र किनारा यामुळे मत्स्यव्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय झाला आहे. यातून परकीय चलनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. देवगडचा हापूस आंबा जसा प्रसिद्ध आहे तसाच मत्स्यव्यवसायही प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. समुद्र किनारा लाभलेली शहरे पर्यटनाबरोबरीने खवय्येगिरीसाठीही प्रसिद्ध होऊ लागली आहेत. मुंबईपासून जवळ असणारे आणि जलवाहतुकीची सुविधा असणार्‍या अलिबाग तालुक्यातील अलिबाग कोळीवाडा आणि साखर येथे मोठ्या प्रमणात ओली मच्छी मिळते. मुंबई येथील व्यापारी आपली वातानुकुलीत गाडी (सर्व सुविधा असणारी) घेऊन थेट बंदरावर येतात आणि त्यामधून मच्छी घेऊन जातात. परदेशात जाणारी मच्छी ही कोचीन येथे पाठविण्यात येते. पापलेट, कोळंबी, सुरमई, बांगडे यांना 1500 ते 2000 किलो मागे भाव मिळतो. यांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते.

मत्स्यव्यवसायाचे प्रामुख्याने 3 विभाग पडतात. सागरी मत्स्यव्यवसाय, निमखार्‍या पाण्यातील मत्स्यव्यवसाय आणि भूजलाशयातील मत्स्यव्यवसाय. मासेमारीबरोबर मत्ससंवर्धन ही संकल्पनाही अलीकडे रूढ होताना दिसत आहे. हे तीनही प्रकार कोकणात मोठे आर्थिक उत्पन्न देतात. यात सागरी मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.

रायगड आणि ठाणे येथे तलावांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करतात. कोकणातील खाडी लगत खाजण क्षेत्र आहे ते कोळंबी संवर्धनासाठी उपयोगात आणतात. कोकणात मासेमारी या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कुटुंबियांची संख्या फार मोठी आहे. कोकणच्या किनार्‍यावर 1966-67 पासून नौकांचे यांत्रिकीकरण करण्यास सुरवात झाली. 1978 पासून राष्ट्रीय सहकारी विकास निगम अंतर्गत यांत्रिकीकरणाची योजना राबविली गेली. यांचा मुख्य उद्देश होता कि किनार्‍यापासून दूर जाऊन मासेमारी करून मत्स्योउत्पादनात वाढ करणे रायगड जिल्ह्यात साधारणपणे 15 हजाराहून अधिक यांत्रिकी नौका आहेत. तर 3 हजाराहून अधिक बिगर यांत्रिकी नौका आहेत. रायगड जिल्ह्यात मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या 51 हजाराच्या आसपास आहे. दरवषी सधारणपणे 40 हजार टन मासेमारीचा व्यवसाय असतो. निर्यातीद्वारे राज्याला चांगल्या प्रकारे परकीय चलन मिळते गेल्यावर्षी 6923 कोटी रुपयांचे निर्यात मूल्य राज्याला मिळाले.

मच्छिमारांना अपघात विम्याचा लाभ

मासेमारी करताना मच्छिमाराचा अपघाती मूत्यू अथवा तो बेपत्ता झाल्यास त्याला शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी, मच्छिमार अपघात गट विमा योजना, अशा कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. 18 ते 65 वयोगटातील मच्छिमारांना अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका असणारे मत्स्यव्यवसाय क्षेत्र हे रोजगार निर्मिती व अनेक दुय्यम उद्योगांच्या निर्मितीला पूरक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT