रायगड

Raigad fire | कोथेरी धरण प्रकल्पाच्या पाईपला भीषण आग; वणव्यामुळे मोठे नुकसान!

हजारो रुपयांचे पाईप भस्मस्थानी

पुढारी वृत्तसेवा

महाड : जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या महाड तालुक्यातील कोथेरी धरणा करिता शिरगाव परिसरामध्ये आणलेल्या प्रोजेक्टमधील एचडीपीई प्रकारच्या पाईपला आज सकाळी 11 च्या सुमारास परिसरात भीषण आग लागली. या आगीच्या वणव्यामध्ये मोठ्या संख्येने पाईप आगीत भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या भीषण आगीमध्ये विभागाची हजारो रुपये किमतीची पाईप भक्षस्थानी पडल्याचे सांगण्यात आले असून या संदर्भात अधिक तपशील गोळा करण्याचे काम विभागाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. मागील वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून या धरणाचे काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी टाकावयाच्या पाईपलाईन करता शिरगाव परिसरामध्ये हे पाईप एकत्रित करून ठेवण्यात आले होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.

या संबंधात कोथेरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे. परिसरात अज्ञात इस्मंकडून लावण्यात आलेल्या तरवा या प्रकारातून सदरची आग लागण्याची भीती व्यक्त केली आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाड नगरपरिषद एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. तरीही मोठ्या संख्येने पाईप या आगीमध्ये भस्मसात पडण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात आर्थिक नुकसान किती झाले याची प्राथमिक माहिती दुपारनंतर प्राप्त होईल असे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT