उरण : सिडकोने नव्याने विकसित केलेल्या उलवे नोड परिसरात तीन नायजेरीयन नागरीकांकडून 1 कोटी 10 लाख 10 हजार 500 रूपये किंमतीचे मादक पदार्थ जप्त केले आहेत. उलवे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्यावर एनडीसीपी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून त्या तीन नायजेरीयन नागरीकांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे न्झेक्वेसु ऑगस्टीन (35), रा. गौरीशंकर को.हौ. सोसा. सेक्टर-17, लॉसन रोमॅनिक (36) रा. गौरीशंकर को.हौ. सोसा. सेक्टर-17) आणि हॅप्पीनेस ईनोस (24) रा. नालासोपारा यांचा मुळ देश नायजेरीया अशी आहेत. त्यांच्याकडून रू 59 लाख 24 हजार रूपये किंमतीचा पांढर्या रंगाची पावडर असलेला 118.48 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन हा अंमली पदार्थ, रू.50 लाख 42 हजार किंमतीचा ब्राऊन रंगाची क्रिस्टल पावडर असलेला 100.84 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, रू.1000 किंमतीचा छोटा इलेक्ट्रॉनिक काटा आणि 43 हजार 500 रूपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.