रायगड

रायगड: मुलीला मेडिकलला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची लाखोंची फसवणूक

अविनाश सुतार

महाड, पुढारी वृत्तसेवा : तुमच्या मुलीला कर्जतच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून कर्जतच्या एका दाम्पत्याने महाडमधील डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाड शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आदेशकुमार पाथरे यांच्या मुलीला कर्जत मधील डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून नितीन जयवंत पवार (वय 34) व निकिता नितीन पवार (वय 30, दोघेही रा. आवळस, ता. कर्जत) या दांपत्याने डॉ. पाथरे यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्यांच्याकडून 6 एप्रिल 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत जुना पोस्ट महाड येथील त्यांच्या क्लिनिक येथून ऑनलाईन तसेच कॅश स्वरूपात 18 लाख 80 हजार रुपये घेतले होते. त्यातील चार लाख रुपये डॉ. पाथरे यांना त्याने परत केले. परंतु, उर्वरित रक्कम देण्यास मात्र या दांपत्याने टाळाटाळ केली. तसेच पाथरे यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न देता त्यांची फसवणूक तर केलीच शिवाय त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास देवून शिवीगाळ करून धमकीही दिली.

या प्रकरणी आदेशकुमार पाथरे यांनी दाम्पत्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार महाड शहर पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT