माणगाव : कमलाकर होवाळ
राज्याचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून पर्यटनाला चालना दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माणगावमधील प्रलंबित जी काही विकास कामे आहेत ती देखील येणार्या काळात मार्गी लावू. रायगड हा विकासाचा केंद्रबिंदू राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणगाव येथे बोलताना व्यक्त केला.
माणगाव येथील शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्यासह आठ नगरसेवक तसेच समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश व जाहीर सभेचा कार्यक्रम मातोश्री गंगुबाई शिंदे सीबीएससी स्कूल येथील भव्य मैदानावर तसेच अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथील गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजचा नामकरण व उदघाटन सोहळा शनिवारी ( 2 ऑगस्ट ) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व खा.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, तुकाराम सुर्वे, मुश्ताक अंतुले, प्रदेश हनुमंत जगताप, सुधाकर घारे, सुभाष केकाणे, उमा मुंढे, सचिव जाधव, बाबूशेठ खानविलकर महंमद मेमन, विजयराव मोरे, मुक्तार वेलासकर, शेखरशेठ देशमुख, दाजी विचारे, अशोक भोपतराव, सुभाष निकम, बाळाजीराव जाधव, महादेव बक्कम, तुकाराम सुतार, रामभाऊ टेंबे, बाळा खातू, महादेव पाटील, शादाब गैबी, आनंद यादव, योगिता चव्हाण, संगीता बक्कम, काका नवगणे, रोह्याचे समीर शेडगे, रवींद्र मोरे, शैलेश भोनकर, चंद्रकांत रोडे, हर्षदा काळे, नितीन वाढवळ, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, श्रद्धा यादव, जयंत बोडेरे, उत्तम जाधव, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित होते.
पक्षातील जुन्या व नवीन सहकार्यांनी घट्ट मूठ बांधून पक्षाचे काम . येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण नवीन चेहर्यांना संधी देणार आहोत. असे सांगत त्यांनी प्रवेशकर्त्यांना पक्षात मान सन्मान दिला जाईल असे सांगितले. नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले असून त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून व्हावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी खा. सुनील तटकरे यांनी येणार्या काळात पक्षातील जुन्या - नव्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी खबरदारी घेतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वानी कामाला लागा. राजुला आता पराभूत करण्याची वेळ येणार नाही तर आता राजुला विजयी करण्याची वेळ येईल. विकास कामांबाबत बोलताना तटकरे म्हणाले केंद्राकडून आपण दिघी औद्योगिक वसाहतीसाठी 40 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. असे जाहीर केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असून राज्यात महायुतीचे सरकार विकासाचे व्हीजन घेऊन काम करीत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाचे ध्येय - धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये काम करीत आहे. सत्ता हे सेवेचे साधन असून सत्ता ही केवळ उपभोगण्यासाठी नसते तर सत्तेत राहून जनतेची कामे झाली पाहिजेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार्या काळात विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर जाणार आहे. माणगावात आज मी अँड. राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजचा उदघाटन केला. उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून व तटकरे साहेबांच्या सहकार्याने राजीव साबळेंनी नर्सिंग कॉलेजची मान्यता मिळविली. आज नर्सेसची देशात व राज्यात मागणी आहे.असेही पवार यांनी अधोरेखित केले.