पेण शहर : पेणच्या हेटवणे धरणाचे पाणी तालुक्यातील वाशी खारेपाट भागाला न मिळता थेट नवी मुंबईला जलबोगदाद्वारे जास्त प्रवाहाने वाहण्यासाठी होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. हेटवणे धरणाची निर्मिती तालुक्याच्या सिंचनासह येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खर्या अर्थाने करण्यात आली खरी.
मात्र हे पाणी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला दिले जात आहे. हे पाणी नवी मुंबई येथील नागरिकांना जास्त प्रवाहाने मिळावे याकरिता सिडकोच्या माध्यमातून मेघा इंजिनीयर कंपनीच्या माध्यमातून जिते आणि बेलवडे येथे जवळपास तीनशे फूट खोल जलबोगद्याची निर्मिती केली जात आहे.
मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंगचे काम सुरू झाल्याने धरणाला याचा धोका पोहचणार असल्याची भीती वर्तविली जात आहे.त्यामुळे जलबोगद्यासाठी सिडकोने जलसंपदा विभागाची परवानगी घेतली आहे का, ब्लास्टिंग करण्यासाठी गौण खनिज विभागाची परवानगी, ब्लास्टिंगसाठी किती रॉयल्टी भरली आहे. तसेच यामुळे आजूबाजूच्या गावांना होणारा धोका याची नागरिकांना देणे गरजेचे आहे. अशी मागणी केली.
हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम पेणकरांसाठी आहे.मात्र सिडको नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे जिते आणि बेलवडे हद्दीत ब्लास्टिंग करून ग्रॅव्हिटीने पाणी तेथील वसाहतींना घेऊन जात आहेत.एकतर धरणाला धोका निर्माण होणार नाही असा कायदा शासनाचा असतानाही याकडे डोळेझाक करून जलबोगदा खोदण्यात येत असताना काही दिवसांपूर्वी हेटवणे धरणा जवळ असणार्या पाली भागातील महागाव येथे भूकंपाचा धक्का जाणवल्याचे समजते तसेच बेलवडे जवळील घरांना सुद्धा यामुळे तडे गेले असे असतानाही याबाबत संबंधित प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.एकतर हेटवणे धरणाचे पाणी फक्त आणि फक्त पेणकरांसाठीच आहे.त्यामुळे वेळ पडल्यास संघर्षाची भूमिका घेतली जाईल.नंदा म्हात्रे , सामाजिक कार्यकर्त्या