विक्रम बाबर
पनवेल : कामोठे परिसरात मंगळवारी रात्री १७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या कामोठे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे युवकाच्या मित्र प्रवास कडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिगर पावणेकर (वय १७, रा. कामोठे) असे जखमी युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी रात्री कामोठे सेक्टर ३६ येथील झुडियो मॉल परिसरात ही घटना घडली. एका तरुणीने फोन करून बोलावल्याने जिगर कामोठे सेक्टर ३६ येथील झुडियो मॉलजवळ गेला होता. त्या वेळी त्या ठिकाणी ती तरुणी देखील उपस्थित होती, दोघांचे बोलणे सुरू असताना, त्या परिसरात उपस्थित असलेल्या दोन अज्ञात युवकांनी स्वतःच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र जिगरने घटना स्थानावरून पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले, या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि हातावर खोल जखमा झाल्याच्या अवस्थे मध्ये त्याला कामोठे मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले, त्या वेळी तो रक्त बांबाळ अवस्थे मध्ये होता, तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले या घटनेची माहिती स्थानिक कामोठे पोलिसांना मिळताच कामोठे पोलिसाने घटनास्थळी पोचून जखमी जिगर ची चौकशी केली आणि आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला का झाला कोणी केला याचा शोध कामोठे पोलिस घेत आहे. या घटनेची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.