नेरळ पोलीस ठाणे Pudhari News Network
रायगड

Raigad Crime | अश्लील कृत्य करणार्‍या तरुणाच्या आवळल्या मुसक्या

नेरळ पोलिसांची कारवाई; आरोपीला बदलापूर येथून केली अटक

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : गावाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने भर रस्त्यात दुपारच्या वेळेला महिलेला अडवून दुचाकीवरील तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. दरम्यान पीडित महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच नेरळ पोलिसांनी आरोपी तरुणाच्या बदलापूर येथून काही तासातच मुसक्या आवळल्या आहे. आरोपीचे नाव विजय चंद्रकुमार तेलगर (34 वर्ष) असे आहे.

मंगळवार (दि.25) रोजी दुपारच्या सुमारास कर्जत कल्याण या राज्य मार्गावरून पीडित महिला ही रायगड हॉस्पिटल येथे कामानिमित्ताने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात तरुणाने महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले होते. डीक्सल येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय या रस्त्यावरच महिलेला अडवून तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य करून महिलेस लज्जा उत्पन्न करण्याचा धक्कादायक प्रकार नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे समोर आले होते.

सदर घटनेप्रकरणी पीडित महिला घटनास्थळी घाबरून गेली असल्याने आरोपी तरुण हा घटनास्थळाहून फरार झाला होता. या घडलेल्या घटनेबाबत पीडित महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली असता. तपासिक अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांची पांगे यांनी एक पोलीस पथक तयार करून घडलेल्या घटने ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता व सदर आरोपीत तरुणाच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने पोलिसांन समोर आरोपी शोध घेण्याचे मोठे आव्हान होते.

मात्र कर्जत - कल्याण राज्य मार्गावरील बदलापूरकडे जाणार्‍या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता सदर आरोपीत तरुण हा ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर सोनिवली येथील त्रिशूळ, गोल्डन व्हिला येथील राहाणारा असल्याचे निष्पन्न होताच गुन्हा घडला त्या रात्री उशिरा अवघ्या सहा तासात नेरळ पोलीसांनी अश्लील कृत्य करणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीत तरुणाचे नाव हे विजय चंद्रकुमार तेलगर, वय वर्ष 34 असे समोर आले असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे.

एक पोलीस पथक तयार करून घडलेल्या घटने ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता व सदर आरोपीत डोक्यावर हेल्मेट असल्याने पोलिसांन समोर आरोपी शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. मात्र कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील बदलापूरकडे जाणार्‍या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता सदर आरोपीत तरुण हा ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर सोनिवली येथील त्रिशूळ, गोल्डन व्हिला येथील राहाणारा असल्याचे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT