पोलादपूर : गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड वर झालेल्या म्युझिक कन्सर्ट दरम्यान दोन युवकांचा ड्रग्सच्या अती सेवनामुळे मृत्यू झाला होता. त्यामध्ये वनराई पोलिस ठाणे मुंबई शहर येथे भारतीय न्याय संहिता आणि NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे आयुष विकी साहित्य (वय : २४ वर्षे, रा-उल्हासनगर) हा मुंबई गोवा महामार्गाने गोवा येथे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी कळविण्यात आली. दरम्यान पोलादपूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तपणे पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
आयुष साहित्य याने "एक्सटसी" या नावाचे अमली पदार्थ सदर म्युझिक कन्सर्ट मध्ये वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे . नमूद आरोपीस वनराई पोलिस ठाणे च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक मॅडम श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे आनंद रावडे याच्या समवेत पोलीस कर्मचारी याच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे.