बोलीं पंचतन (रायगड) : अभय पाटील
म्हसळा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याची उकल दिघी सागरी पोलिसांनी करत दोघ जिणांना अटक केलेली आहे. शाब्दिक वादाचा काटा काढण्यासाठी आरोपींनी म्हसळा पंचायत समितीमधील सेवानिवृत्त कर्मचारी शशांक कुडाळकर यांना दांडक्याने वार करुन ठार मारुन त्यांचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून फेकून दिला होता. या प्रकरणी या प्रकरणी प्रकाश लक्ष्मण वाघमारे आणि संदीप चंद्रकांत पवार दोघेही सध्या रा. खानलोशी आदिवासीवाडी, ता. म्हसळा) यांना अटक करण्यात आली आहे.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी ( २४ डिसेंबर) एक कुजलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळला होता. पोलिसांनी बोर्लीपंचतन बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि शोध पद्धतींचा वापर करून प्रथम मयताची ओळख पटवली. त्यानंतर अत्यल्प पुरावे आणि केवळ एक ब्लॅकेट इतक्याच आधारावर त्यांचे नातेवाईक पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शशांक शरद कुडाळकर ( वय ५९) असे त्यांचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. जालगाव ता. दापोल येथे राहतात. पोलिसांनी त्यांना बोलावून खात्री करून घेतली. शशांक कुडाळकर हे म्हसळा पंचायत समिती येथून सेवानिवृत्त झाले होते त्यांचा घटस्फोट होऊन ते बोर्ली पंचतन येथे एकटेच रहात होते.
मयताच्या पोलिसांना डोक्यावर, शरीरावर जखमा आल्यासाचे निदर्शनास आल्यावर ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय आला. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व शिताफीने तपास सुरू केला त्यानंतर अत्यल्प पुरावे आणि केवळ एक ब्लँकेट इतक्याच आधारावर पोलिसांनी केवळ २४ तासात गुन्ह्याची उकल केली. १९ डिसेंबरला ९ वाजण्याच्या सुमारास प्रकाश वाघमारे आणि त्याचा मित्र चंद्रकांत पवार हे दोघे खानलोशी आदिवासीवाडीतून म्हसळादिघी रोडने एच.पी. पेट्रोलपंप परिसरातून पायी जात होते.
त्यावेळी समोरून शशांक कुडाळकर हा चालत येताना दिसला. १५ दिवसांपूर्वी शशांक कुडाळकर याच्याशी शाब्दिक वाद झाला असल्याने प्रकाश वाघमारेने त्याला पुन्हा एकदा हटकले. या उल्लेखनीय तपास कामगिरीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चौलकर तसेच दिघी सागरी पोलिस पथक अनिल कुटे, शशिकांत भोकारे, संतोष चव्हाण, जिग्नेश चांदणे, पपु भांडालकर, मोगले, केदार, गावंडे यांनी विशेष कसोशीने व कौशल्यपुर्वक तपास करून आरोपींना २४ तासात जेरबंद केले. याचा पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे प्रभारी अधिकारी दिघी सागरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
त्यातून पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात प्रकाश वाघमारे व त्याचा मित्र संदीप पवार यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी दांडक्याने शशांक कुडाळकर याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत शशांक कुडाळकर याचा अंत झाला.
सदर गुन्ह्यांमध्ये दिघी सागरी पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी हनुमंत शिंदे व पोलीस स्टेशन मधील इतर कर्मचारी यांनी खूप कौशल्यपूर्ण तपास करून २४ तासाच्या आत सदर गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे. प्राथमिक दृष्ट्या बघितल्यावर सदर मृत्यू हा आत्महत्या वाटणं फार साहजिक होतं परंतु पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन एका निष्पाप व्यक्तीला न्याय मिळवून देण्यामध्ये यश मिळवलेला आहे. तपासी अधिकारी हनुमान शिंदे यांचे अभिनंदन.सविता गर्जे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन
हत्येनंतर आरोपी फरार
घटनेनंतर दोघेही आरोपी तेथून फरार झाले. गुन्ह्याचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपीने वापरलेला लाकडी दांडका ४ तुकड्यांत फोडून लपवून ठेवला तसेच मयत शशांक कुडाळकर याच्या खिशातील आधारकार्डही लपवले होते. हे साहित पोलिसांनी तपासात हस्तगत केले आहे.