पनवेल : किरकोळ वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या धक्कादायक घटनेने कामोठे परिसरात खळबळ उडाली आहे. “ती”च्या सोबत का बोलतोस, या कारणावरून 17 वर्षीय युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जिगर पावणेकर असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून तो कामोठे परिसरातील रहिवासी आहे. या हल्ल्यात जिगर च्या पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. जिगर पावणेकर (वय 17, रा. कामोठे) असे जखमी युवकाचे नाव आहे.
मंगळवारी ( 7 एप्रिल) दुपारी कामोठे सेक्टर 36 येथील झुडियो मॉल परिसरात ही घटना घडली. एका तरुणीने फोन करून बोलावल्याने जिगर कामोठे सेक्टर 36 येथील झुडियो मॉल जवळ गेला होता. त्या वेळी त्या ठिकाणी ती तरुणी देखील उपस्थित होती.दोघांचे बोलणे सुरू असताना त्या परिसरात उपस्थित असलेल्या काही अज्ञात युवकांनी स्वतःच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र जिगरने घटना स्थानावरून पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि हातावर खोल जखमा झाल्याच्या अवस्थे मध्ये त्याला कामोठे मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले, त्यावेळी तो रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता.
तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले या घटनेची माहिती स्थानिक कामोठे पोलिसांना मिळताच पोलिसाने घटनास्थळी पोहोचून जखमी जिगरची चौकशी केली आणि आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला का झाला कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहे.