रेवदंडा बायपासनजीक चौल तलाठी सजा हद्दीत येत असलेल्या जागेतील कांदळवन तोडून भराव प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pudhari file photo
रायगड

Raigad Crime : रेवदंडा बायपासनजीक कांदळवन तोडून भरावप्रकरणी एकावर गुन्हा

कांदळवन नष्ट करून त्यावर मातीचा भराव

पुढारी वृत्तसेवा

रेवदंडा (रायगड) : रेवदंडा बायपासनजीक चौल तलाठी सजा हद्दीत येत असलेल्या जागेतील कांदळवन तोडून भराव प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने सामाईक गुन्हे दाखल करण्याचा मागणीच्या अर्जानुसार समितीने केलेल्या स्थळ पहाणीत जागेचा सीमांकन नसल्याने कांदळवन तोड पडताळणीचा बोजाबारा उडाला.

रेवदंडयातील एका नागरिकाने कांदळवन नष्ट करून त्यावर मातीचा भराव सदर त्या ठिकाणी बांधकाम केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांचेकडे केली होती. त्यानुसार कांदळवन गठीत समिती स्थापन करून जागेवर जाऊन एकत्रीत स्थळ पहाणीचा सादर केलेल्या अहवालानुसार एफआयआर ०१५१ ने रेवदंडा पोलिसात फक्त जमीन सामाईक खातेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सव्र्व्हे नंबर २६८८ मध्ये खातेदार म्हणून सामाईक भोगवाटेकर म्हणून अन्य व्यक्तींचा उल्लेख आहे. मात्र यांचे संदर्भात फक्त गुन्हा एकाचे नावाने दाखल करण्यात आला. जगदीश लांगी यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार नेमलेल्या समितीने २२ सप्टेंबर रोजी स्थळ पहाणी करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी चौल यांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे आदेशाचे वाचन करून स्थळ पहाणीस प्रारंभकेला, मात्र गट संबंधीत जमीन मिळकतीमध्ये नजर पहाणीत सदरच्या मिळकतीमध्ये सीमांकन निश्चितपणे सांगता येत नव्हते. तसेच स्थळ पहाणी दरम्यान उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सुध्दा उपस्थित नव्हते, त्यामुळे स्थळ पहाणीचा बोजबारा वाजला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT