मिलिंद कदम
माथेरान ः माथेरान मध्ये नगरपालिका निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता दुरंगी लढत होत असून माथेरान मध्ये अनुभवी नेतृत्व अजय सावंत यांनी आपली शेवटची निवडणूक असे जाहीर करत नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिवसेंदिवस त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर ते या निवडणुकीत सामोरे जात आहे. माथेरानच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून,नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही सावंत हे मतदारांना देत आहेत.
माथेरान मधील पर्यटन विकासामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणजे अजय सावंत हे समीकरण अनेक वर्ष सुरू राहिले आहे. स्थानिक नागरिकांना लॉजिंग व्यवसायामध्ये पाठिंबा देऊन या व्यवसायाची सुरुवात त्यांच्याकडून झाल्यानंतर हा व्यवसाय आता माथेरान मध्ये तरुणांना प्रमुख व्यवसाय ठरला आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये माथेरानमध्ये तरुणांना व्हॅली क्रॉसिंग सारखे साहसी खेळांमध्येही प्राथमिकता मिळाली होती हा व्यवसाय सर्व दूर माथेरानचे आकर्षण म्हणून प्रसिद्ध झाला होता, कायम माथेरान करांच्या बरोबर असलेले नेतृत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
कोरोना काळामध्ये सर्व व्यवहार बंद असताना माथेरान करांसाठी ते सदैव उपलब्ध होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये माथेरानमध्ये पर्यटन वाढण्याकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले जे आजही अपूर्ण आहे जे आगामी काळात मार्गी लागावे असा त्यांचा मानस असून येथील वाहनस्थळ प्रश्न,बचत गटांसाठी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जागा उपलब्ध करणे,येथील अश्व चालकांना अनेक वर्षापासून भेडसावणारा अश्वांचा तबेला सारखा जटिल प्रश्न सोडविणे हा त्यांचा मुख्य उद्देश असणार आहे, तरुणांना माथेरान मधेच सन्मानजनक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माथेरान मधील वाहनस्थळ प्रश्न व विविध प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे त्यांनी प्रामुख्याने सांगितले.