अलिबाग: पुढारी वृत्तसेवा: अलिबाग (Alibag) शहरात दुचाकी आणि एसटी बसचा झालेल्या अपघातात विद्यार्थीचा जागीच मृत्यू झाला. जयदीप शेखर बना (वय १७, रा. वरसोली ) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना आज (दि.२७) सकाळी घडली. या अपघातानंतर वातावरण तणावपूर्वक बनले होते. (Raigad Accident News)
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शहरातील बस स्थानकासमोर मागून येणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसली. पुढे अन्य एक एसटी बस होती. दोन गाड्यांमध्ये दुचाकी सापडली. यात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर जमाव आक्रमक झाला होता. जमावाने एसटी बसची तोडफोड केली. यावेळी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही जमाव शांत झाला नाही. अखेर दुपारी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली.