रायगड

रायगड: वरसे येथील गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई

अविनाश सुतार


रोहे : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील निवी आदिवासीवाडी जंगल भागात छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. ही कारवाई रोहा पोलिसांनी आज (दि. ६) सकाळी ६ वाजता केली.

निवी आदिवासी गावाच्या जंगल भागात नदी काठी २ ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची ठिकाणे व मुद्देमाल आढळून आला. या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची रसायने मिळून आली. गूळ, नवसागर मिश्रित १२०० लिटर रसायन, ६ लोखंडी व प्लास्टिक ड्रम असा अंदाजे ५५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

ही कारवाई रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एंदळे, हेडकॉन्स्टेबल हनुमान धायगुडे, पोलीस नाईक सावरटकर, पोलीस कॉन्स्टेबल गुट्टे, पोलीस कॉन्स्टेबल तडवी, हेडकॉन्स्टेबल पेडवी यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT