पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले असून चांढवे टोल नाका येथील अपघाताची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी उभ्या कंटेनर ला मागून येणाऱ्या कारची जोरदार ठोकर बसल्याने कार मधील जागीच ठार झाल्याची घटना पोलादपूर नजीक हॉटेल बालाजी जवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल रावसाहेब मार्केड आपल्या परिवार सह आपल्या ताब्यातील कार एम एच 08 ए एन 2439 घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून महाड बाजू कडून दापोली कडे जात असताना पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी जवळ आले असता रत्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर एम एच 04 एल वाय 1638 ला जोरदार ठोकर बसली असता कारचा चेंदामेंदा झाला या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघात सुवर्णा मार्केड व अनुक्षी अनिल मार्केड याचा जागीच मृत्यू झाला तर अनिल मार्केड याना पुढील उपचार साठी माणगांव मध्ये हलविण्यात आले आहेत तर चिन्मय याला महाड कडे हलविण्यात आले आहे. अपघाताची भीषणता लक्षात घेता पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली चेंदामेंदा झालेल्या कार मधून जखमी यांना बाहेर काढत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करत अनिल यांना पुढील उपचार साठी माणगांव येथे हलविण्यात आले.