श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावाजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. अमरनाथ शत्रुधन दास (वय २५, रा. वाळवटी) असे मृत युवकाचे नावे आहे तर दीपक कुमार दास हा जखमी झाला आहे.
अमरनाथ आपल्या मोटारसायकलवरून वाळवटीकडून खेर्डीकडे जात होता. वळणावर असलेल्या बेकरीजवळील झाडाला त्याची मोटारसायकलची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन अमरनाथ शत्रुधन दास याचा मृत्यू झाला, तर दीपककुमार दास यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. पोलीस ठाणे श्रीवर्धन येथे या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. एस. टी. लहाणे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.