घरकुलाबाबत अधिक माहिती देताना हॉटेल विसावा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रोजेक्टअसोसिएट्स हनुमंत सावंत.  Pudhari News Network
रायगड

रायगड : प्रधानमंत्री आवास योजनेतून 750 घरांची होणार निर्मिती; 12 लाखांत मिळणार घर

पोलादपूर येथे रायगडातील पहिलाच प्रकल्प : अडीच लाखांचे मिळणार अनुदान

पुढारी वृत्तसेवा

महाड : प्रधानमंत्री आवास योजनेच्या २०१६ मध्ये सुरू झालेल्या शहरी भागातील रायगड जिल्ह्यातील पहिल्या गृहनिर्माण प्रकल्पाची सुरुवात पोलादपूर नगरपंचायत हद्दीमधील सावंत कोंड भागात सुरू झाली आहे. या ठिकाणी ७५० घरांची निर्मिती येत्या १८ महिन्याच्या विक्रमी काळात करणार असल्याची माहिती या प्रकल्प विकासकांनी शनिवारी (२२ मार्च) पत्रकार परिषदेमध्ये दिली. लाभार्थ्याला अवघ्या १२ लाखात हे घर उपलब्ध होणार आहे.

हॉटेल विसावा येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स हनुमंत सावंत यांच्यासह जिल्हा प्रवक्ते नितीन पावले व तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. संपूर्ण राज्यात सद्यस्थितीमध्ये १७८ ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकल्प सुरू असून, देशात कर्नाटक महाराष्ट्र नंतर आता नव्याने गुजरात मध्ये शहरी भागात अशा पद्धतीचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ही योजना सुरू करताना केंद्र शासनाने जनसामान्यांना स्वतःच्या हक्काचे घर असावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. ायगड जिल्ह्यात अशा पद्धतीचा हा मोठा प्रकल्प मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनातून सुरू करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले. जनसामान्यांची स्वतःची हक्काची घराची असलेली स्वप्नपूर्ती या प्रकल्पामुळे होणे शक्य होईल असा विश्वास यावेळी श्री संदीप पालकर यांनी व्यक्त केला. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय मान्यता घेण्यात आली असून रेरा ने देखील यास परवानगी दिल्याची

माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील शहरा मध्ये होणाऱ्या या प्रकल्पामध्ये शेतकरी गोरगरीब ग्रामस्थांना योग्य दरामध्ये परवडेल अशा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याची ही सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी या गृहनिर्माण प्रकल्पा स भेट देऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे आवाहन करण्यात आले.

अडीच लाखांचे मिळणार अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरकुल योजने करता एक लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. शहरी भागात या प्रकल्पामध्ये म्हाडा अंतर्भूत झाल्याने प्रधानमंत्री आवासचे एक लाख ५० हजार अधिक म्हाडाकडून एक लाख मिळून दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान या एक बीएचके घरासाठी प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी केवळ एक हजार असेल असे स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT