रायगड

Raigad Zilla Bank: जिल्हा बँकेचा ५५०० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण 

अविनाश सुतार

रायगड: पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नुकताच आपला 5500 कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला आहे. सहकार क्षेत्रातील रोल मॉडेल बँक म्हणून आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेले बदल यामुळे बँकेने हा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्र तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केलेले असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण त्यांच्या समवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे. Raigad Zilla Bank

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक म्हणाले की,  रायगड जिल्ह्रातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्वास आणि बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टीकोनातून हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत झाली आहे. तसेच बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले आहे. यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा  बँकेच्या ग्राहकाला एकच क्रमांक उपलब्ध होणार आहे. Raigad Zilla Bank

बँकेकडून जिल्ह्यातील शेती आणि शेती आधारीत पूरक व्यवसायांना कर्जपुरवठा केला जातो. इतरही व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे. तसेच गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्यातील सहकारी पतपेढ्या , अर्बन को-ऑप.बँका बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृध्दी हे आजवर बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरीत्या पुढे नेत आहोत.  बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत, असे वर्तक यांनी सांगून बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT