रायगडातील 22 हजार लाडक्या बहिणींची रखडली ई-केवायसी pudhari photo
रायगड

Ladki Bahin Yojana : रायगडातील 22 हजार लाडक्या बहिणींची रखडली ई-केवायसी

31 मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत; पनवेल, अलिबाग, माणगावमध्ये सर्वाधिक संख्या

पुढारी वृत्तसेवा

रायगड : लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे. सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे.

रायगडमधील लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 31 मार्च 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. पनवेल आणि अलिबाग तालुक्यात ई-केवायसी रखडण्याची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

महाराष्ट्र शासनाची ‌‘लाडकी बहीण‌‘ योजना सन 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण, स्वावलंबन वाढविणे व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणे

अलिबाग- 2 हजार 633, कर्जत- 1 हजार 962, खालापूर- 1 हजार 772, महाड- 1 हजार 656, माणगाव- 1 हजार 799, म्हसळा- 808, मुरुड- 713, पनवेल- 5 हजार 140, पेण- 1 हजार 533, पोलादपूर- 427, रोहा- 844, श्रीवर्धन- 787, सुधागड-पाली- 489, उरण-1 हजार 376, तळा- 436.

लाभ होऊ शकतो बंद

ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, असे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT