मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी टॅब हद्दीतब 2024 या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर मध्ये एकूण अपघात 34 झाले आहेत.  Pudhari News Network
रायगड

रायगड : कशेडी टॅप पोलीस हद्दीत गतवर्षात 34 अपघातात 16 ठार

12 हजार 302 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई पोटी 1 कोटी 52 लाख 82 हजार 300 रुपयांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : राज्यातील विविध महामार्ग मार्गसह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती नंतरही अपघाताचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या दोन वर्षांचा आलेख लक्षात घेता 2023 मध्ये 32 अपघात मध्ये 32 जणांचा मृत्यू झाला होता तर 2024 मध्ये 2 अपघात जास्त झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी टॅब हद्दीतब 2024 या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर मध्ये एकूण अपघात 34 झाले आहेत. या अपघात 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 12 हजार 302 वाहनचालकांना विरोधात कारवाई करत दंडात्मक कारवाई पोटी 1 कोटी 52 लाख 82 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

मुंबई- गोवा महामार्ग कोकणसाठी महत्त्वाचा आहे. महामार्ग वरील वाहनांची तपासणी अपघात प्रसंगी तातडीची यंत्रणा राबविण्यासाठी पलस्पे फाटा ते तळ कोकण पर्यत 7 ठिकाणी महामार्ग पोलीस यंत्रणा उभारण्यात आली आहे या पैकी रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी महामार्ग पोलीस यंत्रणा उभी करण्यात आली असून या विभागाने आपल्या अधिपत्याखाली असलेल्या मार्गावर केलेल्या वाहनवरील कारवाई पोटी कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला आहे

या महामार्ग पोलिसानी 2015 मध्ये सर्वाधिक वाहन चालकांवर कारवाई केली होती गेल्या वर्षभरात पोलीस दलात बदल झाले असून अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत त्याच प्रमाणे दंडाची रक्कम ऑनलाईन प्रणाली सह विविध नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणार्‍या दंडाची रक्कम मध्ये वाढ केल्याने महसुल मध्ये वाढ होत आहे या मध्ये वेगाने वाहने मार्गस्त करणे वाहनांचे इन्शुरन्स संपले म्हणून कारवाई , मोठी वाहने परमिट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे सर्वात जास्त कारवाई ही ट्राफिक ला अडथळे करणार्‍या वाहन चालकांवर करण्यात आली आहे

कशेडी घाट मध्ये अपघाताचे सातत्य कायम राहिल्याने सदरचा मार्ग कायम चर्चेत राहिला आहे या ठिकाणी पोलिसांच्या दिमाखात नवीन वाहन असेल तरी क्रेन ची कमतरता भासत आहे अपघात घडल्यास महामार्ग विभागाकडे हक्काची क्रेन नसल्याने बाहेरील क्रेन वर आधाराची राहावे लागत आहे.महामार्ग पोलिसानी केलेली जनजागृती सह सुरक्षा सप्ताह सारखे कार्यक्रम योग्य पद्धतीने करत असून गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी नियम तोडणार्‍या गाड्याची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.

महामार्ग पोलीस केंद्राचे स्थलांतर

कशेडी बंगला येथील महामार्ग पोलीस केंद्र चे खेड तालुका खवटी येथे स्थलांतर करण्यात आले आहे मुंबई गोवा महामार्गवरील रायगड व रत्नागिरी हद्द सीमेवरील कशेडी टॅप पोलीस यंत्रणा खेड तालुका खवटी येथे स्थलांतर करण्यात आले आहे कशेडी बोगदा तील 1 बोगदा सुरू झाल्याने बहुतांशी वाहने बोगदा मार्गे मार्गस्त होत असल्याने जुन्या मार्गवरील वाहतूक मंदावली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT