रायगड

Operation Nanhe Ferishte | रायगड: ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत वर्षभरात १०६४ मुलांची सुटका

अविनाश सुतार


रोहे: रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. आरपीएफ मध्य रेल्वेने "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने १०६४ मुलांची मध्य रेल्वेच्या स्टेशनवरून सुटका केली. यामध्ये चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे. Operation Nanhe Ferishte

जी मुले काही भांडणामुळे, काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येतात. त्यांना प्रशिक्षित आरपीएफ कर्मचाऱ्यांनी शोधले आहेत. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. Operation Nanhe Ferishte

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वे विभागातून सुटका करण्यात आलेल्या मुलांचे विभागनिहाय तपशील पहाता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३१२ मुलांची सुटका, भुसावळ विभागात सर्वाधिक ३१३ मुलांची सुटका, पुणे विभागाने २१० मुलांची सुटका, नागपूर विभागाने १५४ मुलांची सुटका, सोलापूर विभागाने ७५ मुलांची सुटका केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT