पनवेल ः तळोजा फेज 2 येथे चालणार्या वेश्या व्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सदर ठिकाणाहून एका बांगलादेशी पीडित महिलेची सुटका केली आहे. वेश्या व्यवसाय चालविणार्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता एक महिला ही वेश्या व्यवसायाकरीता से 17, प्लॉट, नंबर 28, अली अपार्टमेंन्टच्या बाजूस असणार्या बिल्डींगमधील रूम नंबर 202 मध्ये बोलावून घेवून ग्राहकास वेश्यागमनासाठी महिला व मुली दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत आहे.
यासाठी सदरची महिला दोन हजार रूपये स्विकारत असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत सदर बातमीची वपोनि घोरपडे यांनी शहानिशा करून कारवाईबाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त केले. त्यानुसार बनावट ग्राहकास सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगुन उपरोक्त रूममध्ये पाठवले दिले. त्यानंतर बनावट ग्राहकाने केलेल्या सांकेतीक इशार्यावरून पथकाने रात्रीच्या सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी एका महिलेस वेश्यागमनाकरीता ठेवल्याचे आढळून आले.
नमुद दोन्ही वेश्या व्यवसायाकरीता महिला पुरवणार्या महिला यांनी आपसात संगनमत करून बांगलादेशी पिडीत महिलेस प्राप्त करून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेण्यासह आरोपी हसीना मुशरफ खान ही राहत असलेल्या जागेचा वेश्यागमनाकरीता वापर केला. तसेच ती भारतात वास्तव्य करत असल्याबाबत काही वैध पुरावा अगर कागदपत्र आढळून न आल्याने वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवणार्या दोन्ही महिला आरोपींविरूध्द तळोजा पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम 143 (2 ), 3 (5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3, 4, 5, भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी नागरीक अधिनियम कलम 14(अ), अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तर पिडीत महिलेस सुरक्षेकरीता चेंबुर येथे नवजीवन सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
रायगड मतदारसंघात एकूण 24 लाख 68 हजार 120 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 12 लाख 50 हजार 256 मतदार तर महिला 12 लाख 17 हजार 775 मतदार तर तृतीय पंथी 89 आहेत.
शासनाने महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी मतदार नोंदणीचे विशेष अभियान राबवले. महिला मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील हा वाढता सहभाग महत्त्वाचा असून राजकीय पक्षांनीही याची दखल घेऊन महिलांना त्यांच्या मतदारसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व द्यायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. विविध निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना प्राधान्य देण्याचे प्रमाण कमी आहे. राजकीय पक्षांसुद्धा महिलांना उमेदवारी देण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवणारी महिला आरोपी हसीना मुशरफ खान (30 वर्ष), मूळ रा. बांगलादेश हिने बनावट ग्राहकास महिलेस दाखवुन वेश्यागमनाकरीता एक हजार रोख स्वीकारले तसेच तिच्या ओळखीची महिला सालिया शफिक खान (39) पहिला माळा, दिव्याशा हाईटस, सेक्टर नंबर 23, तळोजा फेज-2, मुळ रा. कलकत्ता हिच्या क्युआर कोड बनावट ग्राहकास दाखवून त्यावर एक हजार रूपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले.