पनवेल: पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील पनवेल जेएनपीटी एक्झिट ११ फेब्रुवारीपासून ६ महिन्यांसाठी बंद ठेवणार असल्याची घोषणा प्रशासनाकडून केली होती. परंतु, नोटीफिकेशन काढून देखील एक्झिट रोड आज सुरूच होता. त्यामुळे प्रशासनामधील समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला. (Pune-Mumbai Expressway)
विविध वृत्तपत्र आणि सोबत सोशल मीडियावर 'एक्झिट बंद' च्या वृत्तांमुळे आज कळंबोली सर्कलवर वाहतूक कोंडी दिसून आली. आज तरी हा एक्झिट बंद होणार नाही, संध्याकाळी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अभियंता यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे.