पोलादपूर : इ. शके. एप्रिल 1662 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या प्रतापगडावरील भवानी मातेच्या मूर्तीला तब्बल 363 वर्षे पूर्ण होत असून यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी प्रतापगडावर जय्यत तयारी चालू झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. (Latest Raigad News)
सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेला सातारा व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा प्रतापगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3 हजार 556 फूट उंचीवर असून ऐतिहासिक अशा किल्ल्यात भवानी मातेची मूर्ती असून या ठिकाणी होणार्या नवरात्र उत्सवासाठी रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाण्यासह. राज्याच्या कानाकोपर्यासह देश विदेशातून हजारो भाविक नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थिती लावतात.
प्रतापगडावर होणारा भवानी मातेचा नवरात्र उत्सव हा पाहण्यासारखा असल्याने या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहण्यास मिळते. नवरात्र उत्सवाला 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत प्रतापगडावर मोठा जल्लोष पाहण्यास मिळणार आहे.
प्रतापगडावर येणारा भाविकांसाठी प्रतापगड देवस्थानतर्फे गडावर येणार्या भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लगबग चालू झाल्याचे चित्र प्रतापगडावर पाहण्यास मिळत आहे. भवानी मातेच्या मूर्तीला तब्बल 363 वर्षे पूर्ण होत आहे. सध्या नवरात्र उत्सवासाठी जय्यत तयारी चालू झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.