धनराज गोपाळ
पोलादपूर : पूर मुक्तीसाठी नदीपात्रामध्ये असणारा गाळ काढणे महत्व पूर्ण बनले होते. 2021 च्या महापूरानंतर नदीपात्रातील गाळ काढल्यास पूरापासून मुक्ती मिळले असे चर्चिले जात होते. दरम्यान नदी स्वछता, तलाव स्वछता मोहीम हाती घेण्यात आली. यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.
सद्यस्थितीत पोलादपूर तालुक्यात नद्यांतील 22 ठिकाणी 3 लाख 18 हजार 30 घनमीटर गाळउपसा करण्याच्या कामाला वेग आला आहे. यासाठी 9 कंपन्यांना ठेकेदारी देण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी गेल्या वर्षी दिलेल्या शब्दानुसार, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलादपूर तालुक्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या (कोलाड) कार्यकारी अभियंत्यांनी या कामांची यादी तयार केली आहे. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील २१ आणि महाड तालुक्यातील १ अशा एकूण २२ ठिकाणांचा समावेश आहे.
वाकण गोपाळवाडी ते पितळवाडी (सावित्री नदी): ९,५०० घ.मी.
बोरज ते ढवळी (बोरज नदी): ११,२०० घ.मी.
चिखली पूल, चरई ते जोटा मालार पूल (सावित्री नदी): ९,५०० घ.मी.
साखर (ढवळी नदी पुलाजवळ): १०,५०० घ.मी.
मोरगिरी जॅकवेल ते बाजिरे डॅम (सावित्री नदी): ७,५०० घ.मी.
डोंबेश्वर वाडी ते कापडे हायस्कूल (सावित्री नदी): ६,१९४ घ.मी.
चोळई ते धामणदिवी (सावित्री नदीच्या दोन्ही बाजू): ८,९३२ घ.मी.
चरई: १२,५८६ घ.मी.
लोहारे हद्दीतील दोन्ही बाजू: १२,५०० घ.मी.
लोहारमाळ: १२,५०० घ.मी.
लेप्रसी मिशन हॉस्पिटल ते चोळई नदी: ८,५०० घ.मी.
साखर खडकवाडी (कामथी नदी पात्र बंधारा): ९,०३० घ.मी.
सावित्री नदी ते तुर्भे खोंडा विरा ओहोळ: ९,००० घ.मी.
सडे गावाकडे जाणाऱ्या पुलाचा भाग: ९,५०० घ.मी.
चांभारगणी बुद्रुक घोडवनी उपनदी (महाबळेश्वर पूल ते चांभारगणी हद्द): ९,५०० घ.मी.
ग्रामपंचायत हावरे ते दिवील: ५०,००० घ.मी.
नडगांव ते गांधारी पूल: ५०,००० घ.मी.
सवाद (सावित्री नदीच्या दोन्ही बाजू): १२,५०० घ.मी.
ग्रामपंचायत पार्ले: २५,००० घ.मी.
हावरे: १३,००० घ.मी.
दिवील बंधाऱ्याजवळ: ९,५०० घ.मी.
माटवण: ११,००० घ.मी.