धनराज गोपाळ
पोलादपूर शहर ः पोलादपूर सुरूर महाबळेश्वर राज्य मार्गावरील पोलादपूर ते कापडे रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांवर संबंधित विभाग प्रशासनाकडून लाल मातीची बोळवण रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने सर्वत्र धुरळा उडत असून एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या विभागातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्यावर संबंधित खाते व प्रशासनाकडून लाल मातीचा मुलाला टाकून खड्डे भरले जात असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत असून संबंधित खाते एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल या विभागातील प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे.या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून संपूर्ण महामार्ग उघडला आहे, या रस्त्याला नेमके कोणते ग्रहण लागले याबाबत वाहन चालक आणि प्रवासी जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी संबंधित खात्याने याची त्वरित दखल घेऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या विभागातील स्थानिक नागरिक व प्रवासी जनतेतून व्यक्त केला जात आहे.