एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीच्या फसवणुकीच्या विळख्यात नवी मुंबईकर..!  Pudhari File Photo
रायगड

एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीच्या फसवणुकीच्या विळख्यात नवी मुंबईकर..!

एक्वा मरीन कंपनीकडून लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पनवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्तसेवा

टोरेस कंपनीच्या फसवणुकीत मुंबई सोबत नवी मुंबईकर देखील अडकल्याचे प्रकरण ताजे असताना आता, एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने देखील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून मुंबईसह नवी मुंबईकरांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनी विरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कंपनीने कंपनीमध्ये भागीदारीचे आमिष दाखवून, महिन्याला १५ टक्के देण्याचे आश्वासन दिले होते.

मुंबई येथील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता. कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यानवधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. एक्वा मरीन ग्लोबल कल्चर असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख राहणार अंधेरी यांच्या फिर्यादीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. शेख हे मूळचे मुंबई अंधेरी शहरातील रहिवाशी आहे. शेख यांनी अंधेरीत असलेल्या एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत जवळपास १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, गुंतवणूक करताना शेख यांना कंपनीने मोठ्या परताव्याच्याचे आश्वासन दिले होते. महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूक केल्यानंतर, शेख यांना दोन ते तीन महिने परतावा देखील मिळाला मात्र, परतावा मिळणे बंद झाल्यानंतर शेख यांनी अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली, मात्र कंपनीकडून उत्तर मिळत नसल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय नवे मुंबईत आहे त्या कार्यालयात जाण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्या नुसार शेख हे, खारघर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे, शेख यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट स्थानिक पोलीस स्टेशन गाठून, कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली, शेख यांच्या तक्रारी नंतर, खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून, हा गुन्हा मुंबई अंधेरी एम आय डी सी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे गेल्या नंतर, पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासला सुरवात केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत, या कंपनीचे मालक विनोद कांबळे यांना ताब्यात घेतले आहे, सद्या कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे.

फसवणूक झाली असल्यास तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात यावे : दीपक सुर्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर

एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली असेल तर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात येऊन कंपनी विरोधात तक्रार देण्याची आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी केले आहे.

कंपनीच्या मालकाला अटक

खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, खारघर पोलिसांनी हा गुन्हा अंधेरी एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून, कंपनीच्या मूळ मालक विनोद कांबळे याला अटक केली आहे.

कंपनीचे खोटे आश्वासन

मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एक्वा मरीन कंपनीच्या मालकांकडून गुंतवणूकदारांना ती आश्वासन खोटे दिल्याचे समोर आलेले आहे. एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनी ही वेगवेगळ्या राज्यात फिशिंगचा व्यवसाय करते आणि या फिशिंगच्या व्यवसायासाठी आमच्या कंपनीला गुंतवणूकदार पाहिजेल असल्याचे आश्वासन देऊन कंपनीने अनेक गुंतवणूकदार कंपनीसोबत जोडून घेतले होते आणि यासोबत मोठ्या परताव्याचे अमिषे दाखवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT