कोलाड : विश्वास निकम
खांब येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु असुन आहे. दरम्यान पुलाच्या पायाचे काम पुर्ण झाले होते. इतक्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा काही भाग कोसळला आहे. यामुळे झालेले काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहे ते यावेळी दिसून आले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून सुरु आहे. परंतु अजूनही या रस्त्याचे काम पुर्ण झालेले नाही. याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला भोगावा लागत आहे. खांब नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन कोलाड बाजुकडून नागोठणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. परंतु, नागोठणे बाजुकडून कोलाड बाजूकडील काम ही पूर्ण झाले आहे. ही वाहतूक काही दिवसांनी सुरु केली जाणार होती. परंतु, वाहतूक सुरु होण्याच्या अगोदरच या उड्डाण पुलाची एक बाजु ढासलली यावरून ठेकेदारांनी केलेले काम किती निकृष्ठ दर्जाचे आहे हे लक्षात येते. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.