फिरत्या शौचालयांची दयनिय अवस्था Pudhari Photo
रायगड

Panvel News | फिरत्या शौचालयांची दयनिय अवस्था

पुढारी वृत्तसेवा
पनवेल : विक्रम बाबर

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी पनवेल महानगरपालिकेने खरेदी केलेल्या फिरत्या शौचालयाची अवस्था दयनीय झाली आहे. तुटलेले दरवाजे, गंजलेल्या पायर्‍या, भांडी नसले शौचालय, चोरी गेलेल्या पाण्याच्या टाक्या आणि चिखलात रुतलेले टायर अश्या दयनीय अवस्थेमध्ये पालिकेचे हे फिरते शौचालय शेवटच्या घटका मोजू लागल्या आहेत.

स्वच्छता अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेने सन 2018-2019 मध्ये जवळपास 20 फिरत्या शौचालयाची खरेदी केली. अंदाजे 1 कोटी 44 लाख रुपये खर्च करून या शौचालयाची खरेदी केली होती. शौचालयाची खरेदी केल्यानंतर या शौचालयाचा वापर पालिका हद्दीत करण्यात येत होता. मागेल त्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी या शौचालयाचा वापर होत होता. ही शौचालये काही वर्षांपूर्वी मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील मोकळ्या जागेत चांगल्या सेवा देत होत्या, मात्र अवघ्या 5 वषार्ंच्या कालावधीनंतर या फिरत्या शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे. तर अनेक शौचालये ही मोडकळीस आली असून बेवारस जागेत शेवट्याच्या घटका मोजत आहे.

20 शौचालयांपैकी 8 ते 9 शौचालयांची अवस्था भयानक झाली आहे. या शौचालयांना चक्क पालवी फुटू लागली आहे तर या शौचालयाची चाके देखील चिखलात रुतली आहे. अश्या अवस्थेमध्ये ही शौचालये जुन्या कोर्टाच्या मागील मोकळ्या जागेत, शेवटची घटका मोजू लागली आहेत.

मोकळ्या आणि झाडाझुडपात उभ्या करण्यात आलेल्या या शौचालयाना गंज चढू लागला आहे. वापर होत नसल्याने ही शौचालये पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिसून येऊ नये म्हणून पालिकेपासून लांब अश्या एका कोपर्‍यात उभ्या केल्या आहेत. ही शौचालये अश्या जागी उभे करण्यात आले आहे, कोणाच्या दृष्टीक्षेपात देखील ही शौचालये येणार नाही. याची खबरदारी पालिका अधिकार्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च शौचालयाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याची वेळ पालिकेवर आली आहे.

पालिकेने 2018- 19 मध्ये 20 फिरते शौचालये खरेदी केली होती, पालिका हद्दीतील सावजिनक कार्यक्रमासाठी याचा वापर होत होता. सार्वजनिक असल्याने नागरिक याची तोडामोड करतात. अशी काही शौचालये तुटली आहेत. त्याची दुरुस्ती काही दिवसात केली जाईल.
-संजय जाधव अधिकारी, आरोग्य विभाग, पनवेल मनपा

अनेक शौचालये मोडकळीस

फिरती सार्वजनिक शौचालये काही वर्षांपूर्वी मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील मोकळ्या जागेत चांगल्या सेवा देत होत्या, मात्र अवघ्या 5 वषार्ंच्या कालावधीनंतर या फिरत्या शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे. तर अनेक शौचालये ही मोडकळीस आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT