पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अनेक मतदार केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.  छाया - राजेश डांगळे
रायगड

Panvel Municipal Election : पनवेलमध्ये 58 टक्के मतदान

255 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः विक्रम बाबर

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सरासरी 58 टक्के मतदानझाल्याचा प्राथमिकअंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.या मतदानामुळे 78 जागांसाठीउभ्या असलेल्या 255 उमेदवारांचे राजकीय भवितव्यइव्हीएममध्ये बंदिस्तझाले. शुक्रवारी या मतदानाची मतमोजणी होणार आहे.यामुळे या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली. पहाटेपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाही . सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग तुलनेने कमी राहिला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत अवघे 7 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदानाचा उत्साह वाढताना दिसून आला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाचा आकडा 18 टक्क्यांवर पोहोचला. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग अधिक वाढला. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुमारे 31 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

कामकाजातून वेळ काढून नागरिक मतदानासाठी बाहेर पडू लागल्याने दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. सायंकाळी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 44 टक्क्यांवर पोहोचली होती. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात मतदानाचा वेग कायम राहिला आणि मतदान संपेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी जवळपास 52 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीची मतदान प्रक्रिया एकूणात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पूर्ण झाली. काही तुरळक घटना वगळता कोणताही गंभीर प्रकार न घडता मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत भाजप,शिवसेना (शिंदे) महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे.सत्ताधारी भाजप पुन्हा सत्ता मिळवितो की पनवेलकर परिवर्तनघडवितात याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT