खांदा कॉलनी : पनवेल महानगरपालिकेची अत्याधुनिक प्रशासकीय इमारत ठाणा नाका परिसरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीजवळ उभारली जात आहे. स्वराज्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वास्तुचे काम सहा महि-न्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. ठेकेदाराला दिलेली मुदतही यापूर्वीच संपुष्टात आलेली आहे. तरीही हे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ही वास्तू पूर्णत्वास कधी जाणार याबाबत नागरिकांमधून सांशकता व्यक्त केली जात आहे.
येत्या काही वर्षांत तेथून पालिकेचा कारभार सुरू होणार आहे. नव्या मुख्यालयामुळे प्रशासन अधिक सक्षम होणार असले, तरी नागरिकांच्या दृष्टीने तेथे पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित पादचारी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या पालिकेचे मुख्यालय पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी सहज पोहोचता येते आयुक्त, महापौर, उपमहापौर तसेच लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी नागरिक रिक्षा करून भेटत असतात विविध काम करता पालिका मध्ये येत असतात आज ही काहीना रिक्षा भार्ड परवडत नाही, नवीन इमारतीत कारभार सुरू झाल्यानंतर आयुक्त, महापौर, उपम-हापौर तसेच लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी ठाणा नाका परिसरात जावे लागणार आहे.
खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली तसेच खांदा कॉलनी सेक्टर १७ ते २२ मधील हजारो नागरिकांसाठी रिक्षा हा प्रमुख पर्याय राहणार असून, वाढत्या रिक्षा भाड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. यामुळे पनवेल महानगरपालिकेने नवी मुंबई महानगर परिवहन सेवेशी समन्वय साधून नव्या पालिका मुख्यालयापर्यंत विशेष बससेवा सुरू करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, पनवेल रेल्वे स्थानक आणि ठाणा नाका या मार्गावर नियमित बससेवा सुरू झाल्यास हजारो नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. नवीन पालिका मुख्यालय सुरू होण्यापूर्वी सिडको प्रशासनाने आधुनिक, प्रशस्त आणि दिव्यांगां-साठीही सुलभ असा नवीन पादचारी पूल उभारावा. हा पूल थेट पालिकेच्या नव्या मुख्य इमारतीसमोर उतरावा, अशी कमी खर्चात आणि कमी वेळेत पालिका कार्यालयात पोहोचणे शक्य होईल. नवे पालिका मुख्यालय हे शहराच्या विकासाचे प्रतीक ठरणार असले, तरी त्यास पूरक सार्वजनिक वाहतूक, सुरक्षित पादचारी सुविधा आणि नागरिकाभिमुख नियोजनाची अंमलबजावणी झाली तरच या प्रकल्पाचा खरा लाभ सर्वसामा-न्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
पादचारी पूल सध्या दुरवस्थेत
खांदा कॉलनी ते ठाणा नाका जोडण्यासाठी सिडको प्रशासनाने उभारलेला विद्यमान पादचारी पूल सध्या दुरवस्थेत असून, अनेक ठिकाणी पायऱ्या तुटल्या आहेत. पुलाभोवती झाडाझुडपांनी वेढलेले जंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पथदिव्यांची कमतरता असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा पूल छोटा खांदा गाव प्रवेशद्वाराजवळ उतरतो. त्यामुळे नवीन पालिका मुख्यालयात जाणाऱ्या नागरिकांसाठी त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचेही बोलले जात आहे.