crime news  Pudhari File Photo
रायगड

Panvel Crime | तक्रारीचा राग मनात धरून महिलेला मारहाण; माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा

कामोठे येथील धाकटा खांदा परिसरात घटना

पुढारी वृत्तसेवा

Kamothe Woman Assault Case

पनवेल : पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून महिलेच्या नातेवाइकांना अडवून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याची घटना कामोठे येथील धाकटा खांदा परिसरात घडली. यावेळी एका महिलेचा ब्लाऊज खेचून तिला कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास धाकटा खांदा येथील गणेश बंधाऱ्याजवळ ही घटना घडली. फिर्यादीच्या मोठ्या जावेने संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्या रिक्षाने धाकटा खांदा येथे परतत असताना माजी नगरसेवक आणि त्याचे अन्य साथीदार गणेश मंदिराजवळ थांबले होते. त्यांनी रिक्षा अडवून तक्रार दाखल केल्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीच्या काही नातेवाइक महिला घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी संबंधितांना याबाबत विचारणा केली असता, चौघांनी शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तसेच महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी एका महिलेचा उजवा खांदा पकडून तिचा ब्लाऊज खाली खेचण्यात आला आणि तिला कानशिलात मारण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कामोठे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ११५(२), ३५१, ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ३०९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हेमंत हेंद्रे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT