Jakhamata Devi Panvel Pudhari
रायगड

Jakhamata Devi Panvel: पनवेलच्या जाखमाता देवीची अनोखी परंपरा! चैत्र पालखी सोहळा आणि नवरात्रोत्सवाचे महत्त्व जाणून घ्या

चैत्रातील पालखी सोहळा आणि आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवाला भाविकांची गर्दी; पनवेलकरांचे श्रद्धास्थान असलेल्या जाखमाता देवीची परंपरा

पुढारी वृत्तसेवा

कळंबोली: सन १९४२ ते ४७च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. यावेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडुन अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. परंतू पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती असे भक्त देवीच्या मंदीर परीसरात देवीच्या कृपाछत्राखाली अधिवास करुन राहीले.

त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परीणाम झाला नाही. हया दृष्टांतापासुन जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजुबाजुच्या गावातुन पोहचले. तेव्हा पासुन पनवेलचे जागृत देवस्थान व पनवेलकरांचे दुष्टांपासुन रक्षण करणारी जाखमाता देवी ही भक्तांची माता म्हणुन हदयस्थानी अढळ झाली.

या देवीच्या मंदिरात नवरात्र उस्तव मोठया भक्तीभावाने व जल्लोषात गेल्या अनेक वर्षापासुन साजरा केला जात सहभागी पनवेलची जागृत माता अन पनवेलकरांचे संकटापासुन रक्षण करणारया देवीचे मुळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद ईतिहासात सापडते. नवसाला पावणारी व रोगराई पासुन भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासीयांची आहे.

या देवीचे पुजारी भोपी व जाखमाता मंदीराचे व्यवस्थापक देवीची पुजाअर्चा व देवीच्या मंदीराची सर्व व्यवस्था पाहतात. त्यांचेकडुन देवीबाबत भक्तांची असणारी श्रध्दा त्यांनी विशद केली.प्लेगच्या साथीपासुन पनवेलकरांचे देवीचे रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रध्दा पनवेलवासीयांची झाल्याने त्यांनी देवीची पालखीतुन मिरवणुक काढली.

त्या दिवसापासुन देवीची दरवर्षी चैत्र महीन्यात पालखीचा सोहळा केला जातो. या सोहळयात पनवेल सह आजुबाजुच्या गावातील देवीचे भक्त सहभागी होतात. सदरचा पालखी सोहळा हा रात्री ९ वाजल्यापासुन सुरू केला जातो .तो संपुर्ण पनवेलमधुन फिरुन पहाटेपर्यत देवळात आणण्याची प्रथा गेल्या नऊ ते दहा दशकापासुन सुरू आहे.यावेळी देहभान विसरुन भाविक पालखीच्या मिरवणुकीत भजन आरत्या व देवीचा जयजयकार करीत असतात.परंतू २१ व्या शतकात कायदयाचे बंधन या पालखी सोहळयाला लागल्याने पालखी वेळेच्या बंधनात फिरवली जात आहे.

नवरात्र उस्तवात नवस फेडण्यासाठी पनवेलच्या पंचक्रोशीतील भाविकांची मोठया संख्येने गर्दी होत असते. देवीला साडीचोळी नेसवीणारे व ओटी भरणारे भाविक मोठया प्रमाणावर असल्याचे मंदीराचे पुजारी भोपी सांगतात. देवीच्या नवसात विविधता आढळुन येत आहे.यामध्ये काही भक्त देवीला पाळण्याचा नवस बोलतात तर काही भक्त जन्मलेल्या मुलाचे व्यंग बरे होण्यासाठी साकडे घालुन आपल्या आर्थीक कुवतीनुसार चांदी, तांबे किंवा लाकडी अवयवयांच्या प्रतिकृती देविला अर्पण करुन आपले नवस फेडतात.

गावात जन्माला आलेले बाळ प्रथम देवीच्या पायावर ठेवल्याशिवाय गावाबाहेर न्यायचे नाही असा प्रथा अजुनही पनवेल गावात परंपरेने चालत आलेला पाहावयास मिळतो. नवविवाहीत दापंत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याचा प्रथा आहे. या देवीचे चैत्र महीन्यात निघणारी पालखी सोहळा व आश्‍विन महीन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उस्तव दरवर्षी मोठया श्रध्देने व जल्लोषात साजरे केले जात आहेत.

जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी हयांच्याकडुन त्यांनी आपल्या भोपी परिवार यांना सांगुन ठेवल्या आहेत. त्यामध्ये देवीचे वाहन हे वाघ होते व देवी वाघावर बसुन तेव्हाचे पानवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातुन फेरफटका मारुन गावाचे रक्षण करीत असे. देवीचा वाघ देवीच्या मंदीरात नित्यनेमाने येत असे.

एकदा देवीचा वाघाला देवळात जाण्यास विलंब झाल्याने तो गोंधळुन गेला अन पनवेल मधिल नानासाहेब पुराणिकांच्या घरात शिरला .वाघाला पाहुन लोक घाबरले त्यावेळी जुन्या प्रांत कार्यालयासमोर राहणारया टी.पी.श्रृंगारपुरे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने गोळया घालुन ठार मारल्याचे सांगीतले जाते.

नवरात्री उस्तवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हजारो भक्तगण आपले नवस व आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवी चे दर्शन घेऊन ओटी भरण्यासाठी एकच गर्दी करीत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT