Panvel Municipal Corporation Pudhari
रायगड

Panvel Municipal Corporation: पनवेलमध्ये जनसेवेचा नवा आदर्श; नगरसेविका रुचिता लोंढे यांचा संपूर्ण मानधन ‘महापौर सहाय्यता निधी’त वर्ग करण्याचा निर्णय

महापौर नितीन पाटील यांच्या पदभार स्वीकृतीनंतर समाजाभिमुख उपक्रमाला गती; गरजू रुग्ण, विद्यार्थ्यां व नवउद्योजकांसाठी आर्थिक आधार

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारताच शहरात जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत असतानाच नगरसेविका रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी एक स्तुत्य आणि समाजाभिमुख निर्णय जाहीर केला आहे. नगरसेविका म्हणून पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात मिळणारे आपले संपूर्ण मानधन व भत्ता ‌‘महापौर सहाय्यता निधी‌’मध्ये वर्ग करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महापौर नितीन पाटील यांनी पदभार स्वीकारलेल्या या ऐतिहासिक आणि आनंददायी क्षणाचे औचित्य साधत नगरसेविका लोंढे यांनी जनसेवेचा वसा अधिक दृढ करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच नवउद्योजकांना स्टार्टअपच्या माध्यमातून स्वप्ने साकार करण्यासाठी आर्थिक आधार मिळावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकप्रतिनिधींचे उदाहरण निर्माण झाले आहे.

पनवेलमध्ये जनसेवेची मजबूत परंपरा निर्माण करण्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे नेतृत्व व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगताना नगरसेविका लोंढे यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आशीर्वादामुळेच हा निर्णय घेण्यास प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी

आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेविका म्हणून मिळणारे मानधन आणि भत्ता हा वैयक्तिक लाभ म्हणून न पाहता तो समाजाच्या कल्याणासाठी वापरण्याचा त्यांचा निर्णय हा सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT