Panvel Bus Stand Pudhari
रायगड

Panvel Bus Stand: पनवेल एसटी आगार गेले खड्ड्यात; अवस्था बिकट, प्रवाशांचे हाल,राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष

पनवेल शहराला आता सुंदर शहराचे नामांकन प्राप्त झाले आहे. अशातच पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बस स्थानकाला मात्र घरघर लागलेली दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

सचिन जाधव

खारघर: रायगड जिल्ह्यातील ग्रामीण परंतु महामुंबईचा मुख्य घटक म्हणून नावारूपाला येत असणारे पनवेल शहर. आणि पनवेल शहरा भोवती विस्तारित झालेला सिडकोचा सेक्टर पद्धत यामुळे आता पनवेल तालुक्या सह पनवेल शहर हे ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात नसून मा मुंबईचाएक भाग म्हणून पहिले जाते.पनवेल शहराला आता सुंदर शहराचे नामांकन प्राप्त झाले आहे. अशातच पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बस स्थानकाला मात्र घरघर लागलेली दिसत आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदरचा आराखडा तयार करून प्रशस्त असे बस स्थानक उभे करणार असे सांगितले असता. अजूनही पनवेल स्थानकाची दुरुस्त प्रवासी सहन करत आहेत. म्हणून बस स्थानक हे आता भले मोठे खड्डे आणि खाजगी वाहनांचे पार्किंग स्थळ झाले आहे.

बस स्थानकामध्ये फेरफटका मारला दैनंदिन अवस्था दिसून येत आहे. पनवेल शहर हे रायगड जिल्ह्याचे विकसित तालुका ठिकाण म्हणून किंवा विकसित बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जात होते.

बाहेर गावावरून येणारे नेतेमंडळी असतील अधिकारी वर्ग असेल किंवा देशपातळीवर नेते असतील हे शासकीय विश्रामगृहाचा आधार घेतात किंवा राजकीय नेते मंडळींच्या बैठकांचाही आढावा शासकीय विश्रामगृहावर घेतला जातो.

पनवेल मधील विश्रामगृहाच्या अवस्था ही फार बिकट झाली आहे.इथून हाकेच्याअंतरावर असणारे बस स्टेशन ही आता प्रवाशांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.मागील वर्षी अनेक सामाजिक संस्था राजकीय नेते मंडळी यांनी बस स्थानकाचा विषय अजेंडयावर लावून धरला होता.सुंदर प्रशस्त आणि जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढेल असे बस स्थानक पनवेलमध्ये उभे राहणे गरजेचे आहे.

ज्या पनवेल बस स्थानकावरून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सह नगर, नाशिक आणि कोकण अशा प्रवाशांचे येणे जाणेचालू असते. रायगड जिल्हा असेल सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांना जाणाऱ्या एसटी बसेस मुंबईहून निघाल्यानंतर पनवेल बस डेपो मध्ये येऊन पुढचा प्रवास सुरू करतात. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून जरी पनवेल शहराला यापुढे संबोधले तरी वावगे ठरणार नाही.

अशा महामुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या एसटी आगाराचे दुर्दैवी हाल पाहून आजकालची युवा पिढी हवाल दिल झाली आहे. येत्या काळामध्ये स्थानिक राजकीय नेते मंडळी यांनी ही बाब गांभीर्याने घेत सदरहू बस आगाराचे सुशोभीकरण सर्व सोयुक्त केले तर पनवेलच्या तसेच पनवेल शहराच्या राजवैभवात निश्चित भर पडेल पनवेल आगाराची जागा विचारात घेता इथे उच्च प्रतीचे कमर्शिअल गाळे निघतील शिवाय उत्तम प्रकारचे वाहन पार्किंग व्यवस्था उभी राहील तसेच जिल्ह्याचे वावर अथवा पश्चिम महाराष्ट्राचा कोकणाचा वापर विचारात घेता येते बसेस लागण्यासाठी ही मुबलक जागा आहे हे लक्षात येते याची नक्की नियोजन करून हे जर बस स्थानक उभे केले तर येत्या काळामध्ये राजकीय नेते मंडळी या स्थानकाचे कसे सुशोभीकरण करून उच्च प्रतीचे बांधतील आणि याची लोकसेवा लोकांभातील हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

विमानतळ झाला पण आगार मागासलेलेच

आता हेच पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आता सेतूचा जोडणी या दोन गोष्टींमुळे मुंबई शहरास जोडले गेले आहे.येत्या काळात पनवेल शहर हे नवी मुंबईचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखले जाणार आहे.अशातच शहराचा सुधारित आराखडा तयार करून त्यामध्ये असणारे बस स्थानक असेल अथवा सर्वांनी बांधकाम विभागामार्फत उभे असणारे गेस्ट हाऊस असेल अशा बाबी दुलुशीत करून जमणार नाहीत.

पनवेल बस चालकाची अवस्था ही एखाद्या मागासलेल्या खेड्यात असणाऱ्या बस स्थानकासारखी सारखी झाली आहे. पनवेल शहर हे नवी मुंबईचा घटक आहे हे विसरून जाण्यासारखी ही बाब आहे. बस डेपो मध्ये गेल्या असता भले मोठे खड्डे त्यासाठी पाणी बेस्ट खाजगी वाहन पार्किंग आणि रिमझिम पावसात छत्री घेऊन उभे असलेले एसटीची वाट पाहणारे प्रवासी पाहिले असता एखाद्या विकसित शहरात नसून ग्रामीण भागातील मागासलेल्या गाव खेड्यात आल्यासारखे चित्र बस स्थानकामध्ये दिसून येते. प्रशासनाने पनवेलच्या या बस स्थानकाकडे सुंदर शहर तसेच सुंदर बस स्थानक या भावनेने पाणी आता गरजेचे आहे.
- ओम गारुडकर, रोहा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT