पनवेल : पनवेल ते बदलापूर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या बोगदा (टनेल) प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू असून हा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. सह्याद्री पर्वतरांगातील प्रसिद्ध नवरा-नवरी डोंगर परिसरातून सुमारे चार किलोमीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे पनवेल, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
भोगद्याचे मुख्य खोदकाम आणि रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून सध्या भोगद्यामध्ये लाईट, पंखे तसेच इतर सुरक्षा सुविधांची बसवणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या मार्गावर टोल नाका उभारण्याचे कामही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान काही उत्साही नागरिकांनी पनवेल ते बदलापूर तसेच बदलापूर ते पनवेल असा प्रवास बोगद्यामधून करून पाहण्यास सुरुवात केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र हा मार्ग अद्याप अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सध्या या मार्गावरून पनवेल ते बदलापूर प्रवासासाठी सुमारे दीड तास लागतो. मात्र भोगदा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 10 ते 15 मिनिटांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अजून सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. बोगदा सुरू झाल्यानंतर पनवेल,
अंबरनाथ, बदलापूर तसेच औद्योगिक आणि बंदर क्षेत्रांदरम्यानचा संपर्क अधिक वेगवान होणार असून नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.प्रकल्पात सुमारे 4 किलोमीटर लांबीचा बेोगदा तयार करण्यात येत असून तो मोरबे (पनवेलजवळ) ते भोई गाव (अंबरनाथ-बदलापूर परिसर) दरम्यान उभारला जात आहे. या मार्गावर चार लेनचा आधुनिक रस्ता व टोल नाका उभारण्याचे कामही सुरू आहे. प्रकल्प दिल्ली-मुंबई महामार्गाशी जोडला जाणार असल्याने बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि औद्योगिक क्षेत्रांशी संपर्क अधिक वेगवान होणार आहे. सध्या बांधकाम वेगाने सुरू आहे.
सध्या पनवेल ते बदलापूर प्रवास करण्यासाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागतो. मात्र बेोगदा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.प्रकल्पात सुमारे 4 किलोमीटर लांबीचा बेोगदा तयार करण्यात येत असून तो मोरबे (पनवेलजवळ) ते भोई गाव (अंबरनाथ-बदलापूर परिसर) दरम्यान उभारला जात आहे. या मार्गावर चार लेनचा आधुनिक रस्ता व टोल नाका उभारण्याचे कामही सुरू आहे.